ब्रिजभूषण सिंहांना राजीनाम्याबाबत दिला 24 तासांचा अल्टिमेटम; क्रीडा मंत्र्यांची कारवाई
Admin

ब्रिजभूषण सिंहांना राजीनाम्याबाबत दिला 24 तासांचा अल्टिमेटम; क्रीडा मंत्र्यांची कारवाई

जागतिक चॅम्पियनशिप पदक विजेती विनेश फोगट हिनं भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केलाय.
Published by :
Siddhi Naringrekar

जागतिक चॅम्पियनशिप पदक विजेती विनेश फोगट हिनं भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंग यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप केलाय. आपल्या पदाचा गैरवापर करुन ते खेळाडूंचा मानसिक आणि शारीरिक छळ करत आहेत. असे तिने सांगितले. दिग्गज कुस्तीपटू भारतीय कुस्ती महासंघाचा निषेध करत आहेत. विनेश फोगट आणि साक्षी मलिक यांच्यासह अनेक कुस्तीपटू या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

कुस्तीपटू बबिता फोगट, साक्षी मलिक, बजरंग पुनिया, विनेश फोगट आणि इतर अनेक कुस्तीपटूही क्रीडामंत्र्यांसोबतच्या बैठकीत सहभागी झाले होते. आम्हाला समाधानकारक प्रतिसाद मिळालेला नाही, फक्त आश्वासनं मिळाली आहेत. महासंघाच्या प्रमुखांना पदावरुन हटवून तुरुंगात पाठवलं जात नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन सोडणार नाही. असे विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी सांगितलं.

बैठकीनंतर क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी मोठी कारवाई केलीये. त्यांनी ब्रिजभूषण सिंह यांना 24 तासांत महासंघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास सांगितलंय. तसं न केल्यास त्यांना काढून टाकण्यात येईल, असंही सांगण्यात आलंय.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com