केएल राहुल Asia Cup मध्ये खेळणार की, नाही,  निर्णय पुढच्या आठवड्यात

केएल राहुल Asia Cup मध्ये खेळणार की, नाही, निर्णय पुढच्या आठवड्यात

27 ऑगस्टपासून यूएईमध्ये सुरू होणाऱ्या आशिया कपसाठी टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे. १५ सदस्यीय भारतीय संघात एक नाव केएल राहुलचे आहे. पण, तो ही स्पर्धा खेळण्यासाठी यूएईला जाणार की नाही, याचा निर्णय पुढील आठवड्यात होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

27 ऑगस्टपासून यूएईमध्ये सुरू होणाऱ्या आशिया कपसाठी टीम इंडियाची निवड करण्यात आली आहे. १५ सदस्यीय भारतीय संघात एक नाव केएल राहुलचे आहे. पण, तो ही स्पर्धा खेळण्यासाठी यूएईला जाणार की नाही, याचा निर्णय पुढील आठवड्यात होणार आहे. तुम्ही विचार करत असाल की आता काय हरकत आहे? त्यामुळे यामागचे कारण म्हणजे केएल राहुलच्या फिटनेसवर अजूनही प्रश्नचिन्ह आहे. संघासोबत UAE ला जाण्यापूर्वी KL राहुलला फिटनेस टेस्ट पास करावी लागणार असल्याचं माहिती मिळत आहे. BCCI टीम NCA मध्ये राहुलची फिटनेस टेस्ट घेईल.

केएल राहुल आयपीएल 2022 पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. कंबरेच्या दुखापतीमुळे तो अडकला होता. त्यानंतर तो कोरोनाच्या विळख्यात आला. NCA च्या Insidesport.in ने लिहिले की, राहुल आता बरा झाला आहे पण त्याचा फिटनेस अजून अधिकृतपणे तपासला गेला नाही. बीसीसीआयचे फिजिओ पुढील आठवड्यात राहुलची फिटनेस चाचणी घेतील.

बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की, केएल राहुल त्याच्या दुखापतीतून पूर्णपणे बरा झाला आहे. त्यामुळेच त्याची संघात निवड करण्यात आली आहे. पण प्रोटोकॉल अंतर्गत आम्हाला त्याच्या फिटनेसची चाचणी घ्यावी लागेल. तो बंगळुरूमध्ये त्याची फिटनेस चाचणी देणार आहे.

केएल राहुल Asia Cup मध्ये खेळणार की, नाही,  निर्णय पुढच्या आठवड्यात
Asia Cup Virat Kohli-KL Rahul : विराट कोहली 41 तर केएल राहुल 94 दिवसांनी खेळणार, काही धोका तर नाही ना?
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com