India Vs Bangaladesh
India Vs BangaladeshTeam Lokshahi

बांगलादेशचा पुन्हा भारतावर विजय, 3 सामन्यांच्या मालिकेत बांगलादेश 2-0 पुढे

या विजयाने बांगलादेशाने 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेमध्ये 2-0 ने पुढे आहे. त्यामुळे ही मालिका आता बांगलादेशने आपल्या नावी केली आहे.

भारतीय संघ सध्या बांगलादेश दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघात आजपासून तीन एकदिवसीय सामने खेळवले जात आहे. त्यातल्या पहिला एकदिवसीय सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. आज भारत आणि बांगलादेश यांच्यात ढाकाच्या शेरे बांगला नॅशनल स्टेडियममध्ये दुसऱ्या एकदिवसीय सामना खेळवला गेला. परंतु या सामान्यात भारताचा पराभव झाला आहे. या विजयाने बांगलादेशाने 3 एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेमध्ये 2-0 ने पुढे आहे. त्यामुळे ही मालिका आता बांगलादेशने आपल्या नावी केली आहे.

प्रथम फलंदाजी मैदानात उतरलेल्या बांगलादेशची सुरुवात चांगली झाली नाही आणि अवघ्या 69 धावांत त्यांचे सहा गडी गमावले. मात्र, यानंतर मेहंदी हसन मिराज आणि महमुदुल्लाह यांनी 148 धावांची शानदार भागीदारी करत संघाला मजबूत धावसंख्येपर्यंत नेले. मिरजेने 83 चेंडूंत आठ चौकार आणि चार षटकारांसह नाबाद 100 धावा केल्या. महमुदुल्लाहनेही ७७ धावांची चांगली साथ दिली. भारताकडून वॉशिंग्टन सुंदरने सर्वाधिक तीन बळी घेतले. बांगलादेशने भारताला 271 धावांचे लक्ष्य दिले होते.

या लक्ष्याचा पाठलाग करताना विराट कोहलीने शिखर धवनसोबत डावाची सुरुवात केली. भारतीय कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे सलामीला येऊ शकला नाही. भारताने अवघ्या 13 धावांतच दोन्ही विकेट्स गमावल्या. 65 धावांत चार विकेट पडल्या होत्या. पण, डाव सांभाळण्याचे काम श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेल यांनी केले. दोघांनी पाचव्या विकेटसाठी 107 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी केली. ८२ धावांची शानदार खेळी खेळून अय्यर बाद झाला, तर अक्षरने ५६ धावांचे योगदान दिले.

India Vs Bangaladesh
वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये मीराबाई चमकली; हाताला दुखापत होऊनही पटकावले रौप्य पदक

43व्या षटकापर्यंत भारताने 207 धावांवर सात विकेट गमावल्या होत्या आणि त्यानंतर रोहितने फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. रोहितने 28 चेंडूत 51 धावांची नाबाद खेळी खेळली. रोहितच्या खेळीत तीन चौकार आणि पाच षटकारांचा समावेश होता. शेवटच्या दोन षटकात भारताला विजयासाठी 41 धावांची गरज होती. पण, तो आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. भारत 1 बाद 266 धावांच करु शकला. सलग दोन सामने गमावण्याबरोबरच भारताने मालिकाही गमावली असून बांगलादेशने चमकदार कामगिरी करत भारताला धूळ चारली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com