Michael Neser Catch
Michael Neser CatchTeam Lokshahi

Video : बाऊंड्रीबाहेर 3 मीटरवर घेतला कॅच, तरीही आउट! क्रिकेटविश्वात खळबळ

ऑस्ट्रेलियाच्या देशांतर्गत टी-20 लीगमधील कॅचवरून गदारोळ निर्माण झाला आहे.

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियाच्या देशांतर्गत टी-20 लीगमधील कॅचवरून गदारोळ निर्माण झाला आहे. सिडनी सिक्सर्स टीम आणि ब्रिस्बेन हीट टीम यांच्यात खेळवण्यात आलेल्या सामन्यादरम्यान ब्रिस्बेन हीटचा खेळाडू मायकेल नेसरने एक कॅच पकडला. यावरून चाहते आणि क्रिकेट तज्ज्ञांमध्ये वाद सुरू झाला आहे.

Michael Neser Catch
WTC Final: भारताच्या सर्वात मोठ्या 'शत्रू'ला मोठा धक्का, या ICC ट्रॉफी शर्यतीतून बाहेर

सामन्याच्या सुरुवातीला सिडनी सिक्सर्सविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना ब्रिस्बेन हीट टीमने 224 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना सिडनी सिक्सर्सला केवळ 209 धावा करता आल्या. व 15 धावांनी त्यांनी सामना गमावला. सिडनी सिक्सर्सच्या फलंदाज जॉर्डन सिल्कने तुफानी खेळी करत 23 चेंडूत 41 धावांची खेळी केली होती. सिडनी सिक्सर्स जिंकण्याची आशा असतानाच मायकेल नेसरने जॉर्डनचा अप्रतिम कॅच घेतला. बाऊंड्री लाईनबाहेर कॅच घेऊन मायकेलने सामना टीमच्या खिशात घातला.

परंतु, आता या कॅचवरून वाद निर्माण झाला आहे. मायकलने हा झेल पकडला तेव्हा बॉल बाऊंड्री लाईनवर हवेत होता. यावेळी त्याचा तोल जात असताना तो बाऊंड्रीच्या बाहेर गेला. त्यानंतर बाऊंड्रीच्या बाहेर त्याने बॉल हवेत फेकला आणि बाऊंड्रीच्या आत येऊन मायकलने कॅच पकडला. बारकाईने पाहिल्यानंतर अंपायरने जॉर्डनला बाद घोषित केले. यानंतर चाहते संतापले असून हा कॅच चुकीचा असल्याचे म्हंटले आहे. तर, काहींनी मायकेल नसीरचा असा कॅच पकडण्यासाठी खूप संयम बाळगावा लागतो, असे म्हणत कौतुक केले आहे.

नियम काय सांगतो?

मेरीलेबोन क्रिकेट क्लबने (MCC) घालून दिलेल्या नियमानुसार, खेळाडू आणि बॉल यांच्यातील पहिला संपर्क सीमेच्या आत असणे आवश्यक आहे. सीमारेषेबाहेरील फिल्डरचा संपर्क बॉल आणि मैदानाशी एकाच वेळी नसावा. नियमांनुसार मायकल नसीरचा झेल योग्य असला तरी आता नियमांवरच प्रश्न उपस्थित केले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com