बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा : भारताची दुहेरी कांस्यकमाई

बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा : भारताची दुहेरी कांस्यकमाई

४४व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत मंगळवारी कांस्यपदकाची कमाई केली. तसेच महिला विभागात १०व्या फेरीअंती अग्रस्थानी असलेल्या भारतीय ‘अ’ संघाला अखेर कांस्यपदकावर समाधान मानावे लागले.
Published by :
Siddhi Naringrekar

४४व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत मंगळवारी कांस्यपदकाची कमाई केली. तसेच महिला विभागात १०व्या फेरीअंती अग्रस्थानी असलेल्या भारतीय ‘अ’ संघाला अखेर कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. तिसऱ्या स्थानासाठी भारतीय ‘अ’ संघ आणि अमेरिकेमध्ये १७-१७ गुणांची बरोबरी होती. मात्र, टायब्रेकरमधील सरस गुणफरकामुळे भारतीय संघाला कांस्यपदक जिंकले. डी. गुकेश आणि आर. प्रज्ञानंद यांनी प्रतिस्पर्धी खेळाडूंना बरोबरीत रोखले. भारतीय ‘ब’ संघात गुकेश, प्रज्ञानंद आणि साधवानी या १६ वर्षीय त्रिकुटासह, १८ वर्षीय सरिन आणि २९ वर्षीय बी. अधिबन यांचा समावेश होता. या संघाने ११ पैकी आठ लढती जिंकल्या.

खुल्या विभागात, अखेरच्या दिवशी भारतीय ‘ब’ संघाने जर्मनीवर ३-१ अशी मात केली. त्यांच्याकडून निहाल सरिन आणि नागपूरच्या रौनक साधवानीने निर्णायक विजयांची नोंद केली. खुल्या विभागातील दुसऱ्या मानांकित भारतीय ‘अ’ संघाला यंदा अपेक्षित कामगिरी करण्यात अपयश आले. त्यांनी अखेरच्या फेरीत अग्रमानांकित अमेरिकेला २-२ असे बरोबरीत रोखले. दुसऱ्या मानांकित भारतीय ‘अ’ संघाला यंदा अपेक्षित कामगिरी करण्यात अपयश आले. त्यांनी अखेरच्या फेरीत अग्रमानांकित अमेरिकेला २-२ असे बरोबरीत रोखले. मात्र, त्यांना स्पर्धेअंती चौथे स्थान मिळाले. तसेच ‘क’ संघाचा कझास्तानविरुद्धचा अखेरचा सामनाही २-२ असा बरोबरीत संपला.

बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धा : भारताची दुहेरी कांस्यकमाई
मुंबई इंडियन्सच्या मालकीन नीता अंबानींना बीसीसीआयने दिला मोठा धक्का
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com