Cricket : कर्णधार रोहित शर्माला कोरोनाची लागण

Cricket : कर्णधार रोहित शर्माला कोरोनाची लागण

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माला शनिवारी रॅपिड अँटीजेन चाचणीत कोरोनाची लागण
Published by :
shweta walge

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) शनिवारी रॅपिड अँटीजेन चाचणीत (rapid antigen testing) कोरोनाची लागण (Corona Positive) झाल्याचे आढळून आले. बीसीसीआयने (BCCI) ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे. तसेच कर्णधार रोहित शर्मा सध्या टीम हॉटेलमध्ये आयसोलेशनमध्ये (isolation)असून बीसीसीआयच्या मेडिकल टीमच्या देखरेखीखाली असल्याचे सांगितले.

यापूर्वी भारतीय संघाचा दिग्गज फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनलाही (Ravichandran Ashwin) कोरोनाची लागण झाली होती. यामुळे तो बाकीच्या खेळाडूंसोबत लंडनला गेला नाही. मात्र, आता तो बरा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, गेल्या आठवड्यात विराट कोहलीलाही (Virat Kohli) कोरोनाची लागण झाली होती. मात्र, आता तोही बरा आहे.

भारत आणि इंग्लंड (India and England) यांच्यातील एकमेव कसोटी सामना १ जुलैपासून सुरू होणार आहे. गेल्या वर्षी झालेल्या टेस्ट सीरीजचा हा भाग आहे. गेल्या वर्षी भारतीय संघ पाच सामन्यांच्या टेस्ट सीरीजसाठी इंग्लंडला पोहोचला होता, मात्र चार सामन्यांनंतर भारताचे काही खेळाडू आणि प्रशिक्षकांना कोरोनाची लागण झाल्याचे आढळून आले. अशा स्थितीत टीम इंडियाने चार कसोटीनंतर पाचवी कसोटी खेळण्यास नकार दिला. तीच चाचणी या दौऱ्यात घेतली जात आहे. पाच टेस्ट सामन्यांच्या सीरीजमध्ये भारतीय संघ सध्या २-१ ने आघाडीवर आहे. वर्ल्ड टेस्ट चैंपियनशिपच्या (World Test Championship) दृष्टिकोनातूनही ही चाचणी अत्यंत महत्त्वाची आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com