BCCI|IPL
BCCI|IPLteam lokshahi

BCCI 60 हजार कोटी कमवणार? आयपीएलच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये आश्चर्यकारक उडी

त्यामुळे स्पर्धेच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये विक्रमी वाढ झाली आहे
Published by :
Shubham Tate

ipl media rights : इंडियन प्रीमियर लीगमधून बीसीसीआयला करोडोंची कमाई होते. जगातील कोणतेही क्रिकेट बोर्ड इतक्या पैशांचा विचारही करू शकत नाही. जगात बीसीसीआयची प्रतिष्ठा केवळ आयपीएलमुळेच वाढली आहे. पण आता आयपीएलमुळे बीसीसीआय वेगळे स्थान मिळवणार आहे. (cricket photos ipl media rights bcci can get 60000 rupees from auction)

बातम्यांनुसार, बीसीसीआय आयपीएल मीडिया राइट्समधून 60 हजार कोटी कमावणार आहे. पाच कंपन्या शर्यतीत आहेत. Viacom 18, Disney-Hotstar, Sony, Zee, Amazon यांच्यात IPL मीडिया हक्क मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू आहे. दरम्यान, ब्रोकरेज फर्म एलारा सिक्युरिटीजने दावा केला आहे की हक्कांसाठी ही बोली 50 ते 60 हजार कोटी रुपयांपर्यंत जाऊ शकते.

BCCI|IPL
जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा दलांची कारवाई, 24 तासात 4 दहशतवादी ठार

आयपीएलच्या मीडिया अधिकारांमध्ये टीव्ही, डिजिटल आणि परदेशात सामना दाखवण्याच्या अधिकारांसाठी वेगळी बोली लावली जाईल. यासोबतच प्लेऑफ सामन्यांच्या हक्कांची बोलीही वेगळी असेल. रिपोर्ट्सनुसार, यावेळी टीव्हीवर सामना दाखवण्यासाठी प्रति सामन्यासाठी 49 कोटी रुपये खर्च येतो. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या स्पर्धेचा टीआरपी आयपीएल 2022 मध्ये घसरला होता. मात्र, याचे कारण चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्ससारख्या बड्या संघांची खराब कामगिरी असल्याचे सांगण्यात आले.

2018 ते 2022 या वर्षात बीसीसीआयने आयपीएल मीडिया हक्कांमधून 16,300 कोटी रुपये कमावले आहेत. पण आता आयपीएल हा मोठा ब्रँड बनला आहे. आता या लीगमध्ये 10 संघ खेळत आहेत. त्यामुळे स्पर्धेच्या ब्रँड व्हॅल्यूमध्ये विक्रमी वाढ झाली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com