pat-cummins
pat-cummins

MI vs KKR | पॅट कमिन्सची फास्टेस फिफ्टी; मुंबईची पराभवाची हॅट्ट्रिक

मुंबईने दिलेले 162 धावांचे लक्ष्य KKR ने पाच विकेट आणि 24 चेंडू राखून पार केलं.
Published by :

मुंबईने दिलेल्या 161 धावांचे आव्हान कोलकात्ताने सहज पुर्ण करत आणखीण एका विजयाची नोंद केली आहे. पॅट कमिन्सने फास्टेस फिफ्टी मारत सामना 16 षटकाआधीच मॅच संपवली. त्यामुळे मुंबईची पुन्हा एकदा हार झाली असून आता पराभवाची हॅट्ट्रिक झाली आहे.

केकेआरने (Kolkata Knight Riders) टॉस जिंकून मुंबईला (Mumbai Indians) प्रथम फलंदाजीला निमंत्रित केलयं. फलंदाजीला उतरलेल्या मुंबईची (Mumbai Indians) सुरूवात चांगली झाली नाही.कर्णधार रोहीत शर्मा 3 धावावर बाद झाला आहे. रोहित शर्माच्या रुपात मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) पहिली विकेट गेली आहे. तीन धावांवर उमेश यादवने सॅम बिलिंग्सकरवी झेलबाद केलं. त्यानंतर डेवाल्ड ब्रेविसने 19 चेंडूत 29 धावा केल्या. यात दोन चौकार आणि दोन षटकार होते. वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर बिलिंग्सने स्टम्पिंग केलं. तर इशानने 21 चेंडूत `14 धावा केल्या. यात एक चौकार आहे. या बळावर मुंबईने (Mumbai Indians) कोलकात्तासमोर 161 धावांचे आव्हान ठेवले होते.

या आव्हानाचा पाठलाग करायला उतरलेल्या कोलकात्ताचीही सुरूवात चांगली झाली नाही.अजिंक्य रहाणे सात धावांवर आऊट झाला. टायमल मिल्सने त्याला सॅम्सकरवी झेलबाद केलं. कॅप्टन श्रेयस अय्यरने डॅनियल सॅम्सच्या गोलंदाजीवर तिलक वर्माकडे सोपा झेल दिला. त्याने 10 धावा केल्या. सॅम बिलिंग्सला 17 धावांवर OUT केलं. नितीश राणा आठ धावावर आऊट झाला आहे. यानंतर उतरलेल्या पॅट कमिन्सने 14 चेंडूत हाफ सेंच्युरी झळकावली आहे. कमिन्सने 15 चेंडूत नाबाद 56 धावा फटकावल्या. या खेळीत चार चौकार आणि सहा षटकार होते. वेंकटेश अय्यरने शानदार हाफ सेंच्युरी झळकावली आहे. मुंबई इंडियन्सची गोलंदाजी फोडून काढली. मुंबईने दिलेले 162 धावांचे लक्ष्य KKR ने पाच विकेट आणि 24 चेंडू राखून पार केलं. मुंबईने पराभवाची हॅट्ट्रिक केली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com