ICC Ranking Mohamad Siraj
ICC Ranking Mohamad SirajTeam Lokshahi

आयसीसीची वनडे बॉलर रॅंकिग जाहीर; सिराज ठरला विश्वातील एक नंबरचा गोलंदाज

सिराजने श्रीलंका आणि न्यूझीलंड विरुद्धचा सामन्यात तुफान कामगिरी केली. सिराजने गेल्या 20 सामन्यांमध्ये 37 विकेट्स घेण्याची कामगिरी केली.
Published by :
Sagar Pradhan

नुकताच झालेल्या न्यूझीलंड विरुद्धच्या एकदिवसीय मालिकेनंतर आता भारतीय संघ वनडे रँकिंगमध्ये एक नंबरचा संघ ठरला आहे. त्यानंतर आता आयसीसीने वनडे बॉलर रॅंकिग जाहीर केली आहे. यामध्ये भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज याने धमाका केला आहे. मोहम्मद सिराज क्रिकेट विश्वातील एक नंबर गोलंदाज ठरला आहे. सिराजने ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज जोश हेझलवूड याला मागे टाकत ही एक नंबर कामगिरी केली आहे.

सिराजने त्याच्या वनडे करिअरमध्ये पहिल्यांदा पहिलं स्थान पटकावलंय आहे. मागील 12 महिन्यांमध्ये त्यांनी ही धमाकेदार कामगिरी केली आहे. सिराजने आपल्या बॉलिंगने सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं. सिराजने श्रीलंका आणि न्यूझीलंड विरुद्धचा सामन्यात तुफान कामगिरी केली. सिराजने गेल्या 20 सामन्यांमध्ये 37 विकेट्स घेण्याची कामगिरी केली.

रँकिंगमध्ये कोण कुठे?

आयसीसीकडून जाहीर करण्यात आलेल्या रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलियाच्या जॉश हेझलवूडची दुसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. तर न्यूझीलंडचा ट्रेन्ट बोल्ट तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर सिराज व्यतिरिक्त टीम इंडियाच्या एकाही गोलंदाजाचा पहिल्या 10 मध्ये समावेश नाही.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com