Indian Team
Indian Team Team Lokshahi

ICC Rankings: वर्ल्ड क्रिकेटमध्ये टीम इंडियाची ऐतिहासिक कामगिरी; नावावर केला सुपर रेकॉर्ड

भारतीय क्रिकेट संघाने अद्भुत कामगिरी करून इतिहास रचला आहे

ICCने नवीनतम कसोटी क्रमवारी जाहीर केली आहे, त्यानुसार भारत आता जगातील नंबर १ कसोटी संघ आहे. भारतीय क्रिकेट संघाने अद्भुत कामगिरी करून इतिहास रचला आहे. हा विक्रम गाठणे आतापर्यंत ऑस्ट्रेलियालाही जमलेले नाही. भारतीय क्रिकेट संघाने नवा इतिहास रचला असून अशी कामगिरी करणारा भारत हा दुसराच देश आहे. नागपूर कसोटीतील विजयानंतर भारताचे आता ११५ गुण झाले असून ऑस्ट्रेलियाचा संघ १११ गुणांसह दुसऱ्या स्थानावर घसरला आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या तिन्ही फॉरमॅटमध्ये एकाच वेळी जगातील नंबर-1 संघ बनून भारताने नवा इतिहास रचला आहे. याआधी टीम इंडिया आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या, कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 या तिन्ही फॉरमॅटमध्ये एकाच वेळी जगातील नंबर-1 टीम बनू शकली नाही, परंतु आता टीम इंडियाने हा मोठा विक्रम केला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com