ICC T20 Ranking: स्मृती मानधना-दीप्ती शर्माने गाठली कारकिर्दीतील सर्वोत्तम रँकिंग
Team Lokshahi

ICC T20 Ranking: स्मृती मानधना-दीप्ती शर्माने गाठली कारकिर्दीतील सर्वोत्तम रँकिंग

भारताची महिला क्रिकेपटू स्मृती मानधना आणि फिरकी गोलंदाज दीप्ती शर्मा यांनी T20 मध्ये कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रमवारी गाठली आहे.
Published by :
shweta walge

भारताची महिला क्रिकेपटू स्मृती मानधना आणि फिरकी गोलंदाज दीप्ती शर्मा यांनी T20 मध्ये कारकिर्दीतील सर्वोत्तम क्रमवारी गाठली आहे. गोलंदाजांमध्ये दीप्ती दुसऱ्या, तर फलंदाजांमध्ये स्मृती मानधना दुसऱ्या स्थानावर आहे. नुकत्याच झालेल्या महिला आशिया चषक 2022 मध्ये दोन्ही खेळाडूंनी चांगली कामगिरी केली होती आणि दोघांनाही त्याचा फायदा झाला आहे.

भारताने या महिन्याच्या सुरुवातीला आशिया कपच्या अंतिम सामन्यात श्रीलंकेचा आठ गडी राखून पराभव करून विक्रमी सातव्यांदा ही स्पर्धा जिंकली. स्मृती मानधना आणि दीप्ती शर्मा यांना या स्पर्धेनंतर फायदा झाला आहे.

वनडेमध्ये फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेली मंधाना टी-20मध्येही दुसऱ्या स्थानावर पोहोचली आहे. याआधीही ती टी-20 क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर आहे. तीने अंतिम सामन्यात 25 चेंडूत नाबाद 51 धावा करत आपल्या संघाला श्रीलंकेवर आठ गडी राखून विजय मिळवून दिला. मंधानाचे 730 रेटिंग पॉईंट आहेत, ते ऑस्ट्रेलियाच्या बेथ मुनीपेक्षा 13 पॉइंट्सने मागे आहेत.

दीप्तीही दुसऱ्या क्रमांकावर पोहोचली

स्पर्धेच्या सुरुवातीच्या सामन्यात थायलंडविरुद्ध 3/7 घेतलेल्या दीप्तीने अंतिम सामन्यातही तिच्या चार षटकांत फक्त 7 धावा दिल्या आणि गोलंदाजांच्या क्रमवारीत दुसऱ्या स्थानावर पोहोचली. तीच्या टी-20 कारकिर्दीतील ही सर्वोत्तम क्रमवारी आहे. तिने महिला आशिया चषक स्पर्धेत 13 विकेट घेतल्या आणि या स्पर्धेतील संयुक्त सर्वाधिक विकेट घेणारी खेळाडू ठरली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com