भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात
Admin

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. या मालिकेतील पहिला सामना नागपूरच्या विदर्भ क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. नागपूर कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियाचा संघही मैदानात जोरदार सराव करताना दिसला आहे. पहिला सामना नागपुरात सकाळी साडेनऊ वाजल्यापासून होणार आहे.

2014 पासून, तीन कसोटी मालिका झाल्या आहेत. ज्यामध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता.भारतीय संघाला टक्कर देण्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या संघाने उत्कृष्ट फिरकीपटूंचा संघात समावेश केला आहे. या मालिकेसाठी रोहित शर्मा भारतीय कर्णधार असून केएल राहुलकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे. कसोटी मालिकेत भारतीय संघ गेल्या काही वर्षांपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्चस्व गाजवत आहे.

कसोटी मालिकेसाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया संघ

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शुभमन गिल, पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), आर. अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, सूर्यकुमार यादव.

ऑस्ट्रेलिया : पॅट कमिन्स (क), अॅश्टन आगर, स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, पीटर हँड्सकॉम्ब, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन, लान्स मॉरिस, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव्ह स्मिथ ( उपकर्णधार), मिचेल स्टार्क, मिचेल स्वीपसन आणि डेव्हिड वॉर्नर.

नागपूर कसोटीसाठी दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग-11

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल/शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, शुभमन गिल/सूर्यकुमार यादव, केएस भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल/कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि सिराज .

ऑस्ट्रेलिया संघ : डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, पीटर हँड्सकॉम्ब, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स (क), अॅश्टन अगर/टॉड मर्फी, नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com