india vs south africa
india vs south africaTeam Lokshahi

IND vs SA: तिसऱ्या वनडेत भारताचा द.आफ्रिकेवर 7 विकेट्सने दणदणीत विजय

भारतीय संघाने 185 चेंडू शिल्लक असताना पूर्ण केले आव्हान. या विजयात भारतीय गोलंदाजांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
Published by :
Sagar Pradhan

भारतीय संघाने शानदार खेळ दाखवत तिसऱ्या वनडेत दक्षिण आफ्रिकेचा सात विकेट्स राखून पराभव केला. या विजयासह त्यांनी वनडे मालिका 2-1 अशी खिशात घातली आहे. भारताला विजयासाठी 100 धावांचे लक्ष्य मिळाले होते, जे त्यांनी 19.1 षटकांत म्हणजे 185 चेंडू शिल्लक असताना पूर्ण केले. कुलदीप यादव सामनावीर तर मोहम्मद सिराज मालिकेतील सर्वोत्तम खेळाडू ठरला.

भारतीय संघाच्या विजयात आपल्या गोलंदाजांव्यतिरिक्त शुभमन गिलने महत्त्वाची भूमिका बजावली. कुलदीप यादवने चार बळी घेतले, तर शुभमन गिलने संयमी 49 धावांची तुफानी खेळी केली. याआधी भारताने दक्षिण आफ्रिकेच्या संघाचा टी-20 मालिकेत 2-1 असा पराभव केला होता.

विजयासह भारताने केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी

तिन्ही फॉरमॅटमध्ये भारताचा यंदाचा हा एकूण 38 वा विजय आहे. यासह, त्याने कॅलेंडर वर्षात सर्वाधिक विजय मिळवण्याच्या ऑस्ट्रेलियाच्या विक्रमाची बरोबरी केली, 2003 मध्ये ही कामगिरी केली. भारताने या वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेतील 0-3 वनडे मालिकेतील पराभवाचा बदलाही घेतला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com