India Vs Australia Test Series
India Vs Australia Test SeriesTeam Lokshahi

ऑस्ट्रेलिया सोबतच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ सज्ज; जाणून घ्या सविस्तर माहिती

4 सामन्यांच्या कसोटी मालिकेला 9 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे.
Published by :
Sagar Pradhan

श्रीलंका आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांविरोधात उत्कृष्ट कामगिरी केल्यानतंर आता भारतीय संघ ऑस्ट्रेलियासोबतच्या कसोटी मालिकेसाठी सज्ज झाला आहे. 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेला 9 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. मालिकेतील सलामीचा सामना नागपूरमध्ये विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. भारतीय संघासाठी ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनलच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघ कसून सराव करत आहेत.

भारत वि. ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेचं वेळापत्रक

पहिली कसोटी, 9-13 फेब्रुवारी, नागपूर

दुसरी कसोटी, 17-21 फेब्रुवारी, नवी दिल्ली

तिसरी कसोटी, 1-5 मार्च, धर्मशाळा

चौथी कसोटी, 9-13 मार्च, अहमदाबाद

भारतीय संघ

रोहित शर्मा (कॅप्टन), केएल राहुल (उपकर्णधार), शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, सूर्यकुमार यादव, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएस भरत (विकेटकीपर), इशान किशन (विकेटकीपर), आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव आणि जयदेव उनाडकट.

ऑस्ट्रेलिया संघ

पॅट कमिन्स (कर्णधार), डेविड वॉर्नर, एश्टोन एगर, स्कॉट बोलँड, एलेक्स कॅरी, कॅमरन ग्रीन, जोश हेझलवुड, पीटर हॅंडस्कॉम्ब, ट्रेविस हेड, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, नॅथन लियॉन, लांस मॉरिस, टॉड मरफी, मॅथ्यू रेनशॉ, स्टीव स्मिथ, मिशेल स्टार्क आणि मिशेल स्वीपसन.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com