आज नरेंद्र मोदी स्टेडियमवर T20 मालिकेतील निर्णायक सामना खेळवला जाणार
Admin

आज नरेंद्र मोदी स्टेडियमवर T20 मालिकेतील निर्णायक सामना खेळवला जाणार

भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना आज (1 फेब्रुवारी) होणार आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

भारत आणि न्यूझीलंड (IND vs NZ) यांच्यातील तीन सामन्यांच्या T20 मालिकेतील शेवटचा आणि निर्णायक सामना आज (1 फेब्रुवारी) होणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर संध्याकाळी 7 वाजता हे दोन्ही संघ भिडतील.

सध्या ही मालिका 1-1 अशी बरोबरीत आहे. अशा स्थितीत आजचा सामना खरोखरच रंजक होण्याची अपेक्षा आहे. तसे पाहता भारतीय संघाचे पारडे जड असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. तीन सामन्यांची ही मालिका सध्या 1-1 अशी बरोबरीत आहे. अशा परिस्थितीत उद्या जो कोणी जिंकेल, मालिका त्याच्या नावावर होईल.

भारतीय संभाव्य संघ

ईशान किशन (विकेटकीपर), शुभमन गिल/पृथ्वी शॉ, राहुल त्रिपाठी, सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या (कर्णधार), वॉशिंग्टन सुंदर, दीपक हुडा, उमरान मलिक/शिवम मावी, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल आणि अर्शदीप सिंग.

न्यूझीलंड संभाव्य संघ

ड्वेन कॉन्वे (विकेटकीपर), फिन ऍलन, मार्क चॅपमन, डॅरिल मिशेल, ग्लेन फिलिप्स, मिशेल सँटनर (कर्णधार), मायकेल ब्रेसवेल, ईश सोधी, लॉरी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर आणि जेकब डफी.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com