भारत विरुध्द न्यूझीलंडमध्ये उद्या होणार निर्णायक सामना, भारत 1- 0 ने पुढे
भारत विरुद्ध न्यूझीलंड संघात सध्या 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका सुरु आहे. त्यातच पहिली सामन जिंकून भारतीय संघ मालिकेत 1-0 ने पुढे आहे. मात्र, आता उद्या म्हणजेच 21 जानेवारी रोजी या दोन्ही संघात दुसरा निर्णायक एकदिवसीय सामना होणार आहे. त्यामुळे हा सामना जिंकून भारतीय संघाचे मालिका जिंकण्याचे ध्येय असेल. त्यामुळे उद्या या दोन्ही संघात सामना जिंकण्याची चांगलीच चुरस पाहायला मिळणार आहे.
कधी, कुठे असेल सामना?
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना रायपूरमधील शहीद वीर नारायण सिंह स्टेडियम येथे खेळवला जाईल. दुपारी 1 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होणार आहे. त्याआधी 1 वाजता नाणेफेक होईल.
असा असेल भारतीय संघ:
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या, वॉशिंग्टन सुंदर, उमरान मलिक, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी
असा असेल न्यूझीलंडचा संघ:
फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे, हेन्री निकोल्स, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक आणि कर्णधार), ग्लेन फिलिप्स, मायकेल ब्रेसवेल, मिशेल सँटनर, हेन्री शिपले, लॉकी फर्ग्युसन, ब्लेअर टिकनर