India W vs Barbados W T20 in CWG 2022: बार्बाडोसचा पराभव करून भारताची उपांत्य फेरीत धडक

India W vs Barbados W T20 in CWG 2022: बार्बाडोसचा पराभव करून भारताची उपांत्य फेरीत धडक

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेला सुरुवात झाली आहे. भारत विरुद्ध बार्बाडोस महिला टी २० सामना बुधवारी (३ ऑगस्ट) इंग्लंडमधील एजबस्टन क्रिकेट स्टेडियममध्ये झाला. बार्बाडोसची कर्णधार हेली मॅथ्यूजने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे भारताला प्रथम फलंदाजी करावी लागली. २० षटकांमध्ये भारताने चार बाद १६२ धावा केल्या.

भारतीय संघाला स्पर्धेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून पराभव स्वीकारावा लागला होता. यानंतर संघाने शानदार पुनरागमन करत पाकिस्तानवर विजय मिळवला होता. शफाली वर्माने २६ चेंडूंत सात चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने ४३ धावा केल्या. तर, जेमिमाह रॉड्रिग्जने ४६ चेंडूंत सहा चौकार आणि एका षटकारासह ५६ धावांची नाबाद खेळ केला.

दीप्ती शर्मानेही नाबाद ३४ धावा करून संघाला १६२ धावांपर्यंत पोहचण्यास मदत केली. जेमिमाह आणि दीप्ती यांनी पाचव्या गड्यासाठी ७० धावांची कामगिरी केली. बार्बाडोसचा १०० धावांनी पराभव करून भारताने उपांत्य फेरी धडक मारली आहे

Lokshahi
www.lokshahi.com