india vs new zealand
india vs new zealandTeam Lokshahi

न्यूझीलंडविरुध्दच्या टी- २० मालिकेसाठी भारतीय संघ सज्ज, उद्या होणार पहिला सामना

T20 मालिकेतील पहिला सामना रांचीच्या JSCA इंटरनॅशनल स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये खेळवला जाणार आहे

न्यूझीलंड विरुद्धतील एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर आता भारतीय संघ उद्या टी-20 मालिकेसाठी भारतीय संघ सज्ज झाला आहे. शुक्रवारपासून भारत आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्याच्या टी 20 मालिकेला सुरुवात होणार आहे. उद्या या मालिकेतील पहिला सामना होणार आहे. परंतु, पहिल्या सामन्याआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. सलामी फलंदाज ऋतुराज गायकवाड याला दुखापत झाल्याचं समोर आले आहे. सीसीआयकडून याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. तर उद्या होणाऱ्या या सामन्याबद्दल सविस्तर जाणून घ्या.

T20 मालिकेतील पहिला सामना रांचीच्या JSCA इंटरनॅशनल स्टेडियम कॉम्प्लेक्समध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना सायंकाळी साडेसातपासून खेळवला जाणार आहे.

टी20 मालिकेचं वेळापत्रक :

पहिला टी-20 सामना 27 जानेवारी 2023 रांची

दुसरा टी-20 सामना 29 जानेवारी 2023 लखनौ

तिसरा टी-20 सामना 01 फेब्रुवारी 2023 अहमदाबाद

भारताचा टी20 संघ

हार्दिक पांड्या (कर्णधार), सूर्यकुमार यादव (उप कर्णधार), इशान किशन (विकेटकिपर), ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, दीपक हुड्डा, राहुल त्रिपाठी, जितेश शर्मा (विकेटकिपर) , वॉशिंगटन सुंदर, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, उमरान मलिक, शिवम मावी, पृथ्वी शॉ, मुकेश कुमार

न्यूझीलंडचा टी20 संघ

फिन ऍलन, डेव्हॉन कॉनवे (wk), मार्क चॅपमन, ग्लेन फिलिप्स, डॅरिल मिशेल, मायकेल ब्रेसवेल, मिचेल सँटनर (सी), लॉकी फर्ग्युसन, जेकब डफी, हेन्री शिपले, ब्लेअर टिकनर.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com