WPL 2023 : मुंबई इंडियन्सची विजयी घोडदौड; RCB चा केला पराभव
Admin

WPL 2023 : मुंबई इंडियन्सची विजयी घोडदौड; RCB चा केला पराभव

मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर नऊ गडी राखून विजय मिळवला.

मुंबई इंडियन्सने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर नऊ गडी राखून विजय मिळवला. यास्तिका भाटियासह हेली मॅथ्यूजनं पहिल्या विकेटसाठी 5 षटकांत 45 धावांची भागीदारी केली. यास्तिका भाटियानं प्रिती बोसच्या चेंडूवर एलबीडब्ल्यू होण्यापूर्वी चार चौकारांच्या मदतीनं 23 धावा केल्या. नाणेफेक जिंकून सर्वात आधी फलंदाजीसाठी मैदानात उतरुन आरसीबीच्या संघाने 18.4 षटकांत 155 धावा केल्या.

सोमवारी ब्रेबॉर्न स्टेडियमवर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 9 गडी राखून पराभव केला. तर रॉयल चॅलेंजर्सचा देखिल पराभव केला. वुमेन्स प्रीमियर लीगमधील मुंबई इंडियन्सचा हा सलग दुसरा विजय आहे.

विकेटकीपर रिचा घोषनं सर्वाधिक 28 धावांची खेळी केली. तर स्मृती मानधना आणि श्रेयंका पाटील यांनी 23-23 धावा केल्या. र्णधार स्मृती मानधना आणि सोफी डिव्हाईन (16 धावा) यांनी आरसीबीला दणका दिला आणि दोघांनी पहिल्या विकेटसाठी 39 धावा केल्या.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com