IND vs PAK
IND vs PAK Team Lokshahi

भारताविरुद्धच्या महामुकाबल्या आधी पाकिस्तान संघाला आणखी एक मोठा धक्का

पाकिस्तान संघातील स्टार फलंदाज ज्याचा भारताविरुद्ध रेकॉर्डही उत्तम आहे, तो दुखापतीमुळे सामन्याला मुकणार आहे.
Published by :
Sagar Pradhan

आजपासून टी20 वर्ल्ड कप 2022ला सुरू सुरवात झाली आहे. उद्या कट्टर प्रतिस्पर्धी मानल्या जाणाऱ्या भारत विरुद्ध पाकिस्तान असा सामना पार पडणार आहे. मात्र, पाकिस्तान संघासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. पाकिस्तानचा स्टार फलंदाज फखर जमान दुखापतीमुळे सामन्याला मुकणार असल्याचे कर्णधार बाबर आझम याने सांगितले आहे. सामन्यापूर्वीच्या पत्रकार परिषदेवेळी बाबर प्लेईंग 11 बद्दल बोलत असताना त्याने ही माहिती दिली.

IND vs PAK
Asia Cup Virat Kohli-KL Rahul : विराट कोहली 41 तर केएल राहुल 94 दिवसांनी खेळणार, काही धोका तर नाही ना?

भारतीय संघातही मोठा बदल होण्याची शक्यता

पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडिया ऋषभ पंतऐवजी दिनेश कार्तिकचा संघात समावेश करू शकते. अलीकडे ऋषभ पंतचा फॉर्म खूपच खराब आहे, त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध दोन सामन्यात 9-9 धावांची इनिंग खेळली होती. त्याचबरोबर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यातही त्याला स्थान मिळालं नाही.

असे असतील दोन्ही संघ

भारतीय संघ

रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, रवीचंद्रन अश्विन, हर्षल पटेल, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार.

पाकिस्तान संघ

बाबर आझम, मोहम्मद रिझवान, शान मसूद, हैदर अली, इफ्तिखार अहमद, आसिफ अली, शादाब खान, मोहम्मद नवाज, नसीम शाह, हॅरिस रौफ आणि शाहीन शाह आफ्रिदी.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com