400 रुपये मजूरीवर बनले खेळाडू... बनावट आयपीएल... अन् पोलिसांचा छापा

400 रुपये मजूरीवर बनले खेळाडू... बनावट आयपीएल... अन् पोलिसांचा छापा

पोलिसांनी चार आरोपींना घेतले ताब्यात

नवी दिल्ली : वडनगर, मेहसाणा येथे ढगाळ वातावरणासह 7 जुलैची दुपारची वेळ आहे, दोन संघ 'चेन्नई फायटर्स' आणि 'गांधीनगर चॅलेंजर्स' टी-20 क्रिकेट सामन्यात आमने-सामने आहेत. प्रथम फलंदाजी करताना चेन्नई फायटर्स 14.3 षटकात 99/3 अशा स्थितीत आहेत. मैदानावरील फलंदाज हसन अली स्ट्रेट ड्राइव्ह मारतो. अंपायर चौकाराचा इशारा करत आहे. हे वाचून तुम्हालाही क्रिकेटची आठवण आली असेल. परंतु, ही कॉमेट्री एक बनावट आयपीलची (Fake IPL) आहे. नुकतेच मेहसाणा पोलिसांच्या स्पेशल ऑपरेशन्स ग्रुपने (SOG) यावर छापा टाकल्याने हे रॅकेट उजेडात आणले आहे. यामध्ये मेहसाणा पोलिसांनी चार जणांना अटक केली आहे. सोएब दावडा, महमद साकिब सैफी, महमद अबू बकर कोलू आणि सादिक दावडा (सर्व रा.वडनगर, मोलीपूर) अशी आरोपींची नावे आहेत.

400 रुपये मजूरीवर बनले खेळाडू... बनावट आयपीएल... अन् पोलिसांचा छापा
नगरपरिषद निवडणुकीचे बिगुल वाजताच क्षीरसागर काका पुतण्याची लढाई भाऊबंधकीवर

पोलिसांच्या माहितीनुसार, एका शेतजमिनीचा तुकडा क्रिकेटच्या मैदानात रूपांतरित केला होता. खेळपट्टी म्हणून पांढऱ्या रंगाची चटई घालण्यात आली होती. खेळपट्टीच्या 90 अंशांवर बांधलेल्या छोट्या केबिनवर एकच कॅमेरा बसवण्यात आला होता. तर मैदानाच्या बाजूला दोन एलईडी टीव्ही स्क्रीनसह दोन जण तैनात होते. एका स्क्रीनवर चेन्नई फायटर्स 103/3 असा स्कोअर दाखवण्यात आला होता. तर दुसऱ्या स्क्रीनवर टेलीग्राम मेसेंजर चॅट बॉक्स दाखवला होता. यात बेंटीग दर दिसत होते.

हा पूर्ण खेळ रशियातील सट्टेबाजांना फसवण्यासाठी सुरु होता. टोळी बनावट क्रिकेट टूर्नामेंटच्या रूपात एक युट्युब शो चालवत होती. खेळाडूंना दररोज 400 रुपये मोजून भाड्याने आणण्यात येत होते. तसेच, स्पीकरमधून बनावट गर्दीचा आवाज येत होता. एवढेच नव्हे तर ब्रॉडकास्टर हर्षा भोगलेंची नक्कल करण्यासाठी समालोचकही नेमण्यात आला होता.

400 रुपये मजूरीवर बनले खेळाडू... बनावट आयपीएल... अन् पोलिसांचा छापा
Chandrashekhar bawankule : ठाकरे सरकारने ओबीसी आरक्षणाबाबत टाईमपास केला

सोएब दावडाने वडनगर तालुक्यातील स्थानिक क्रिकेट खेळणार्‍या मुलांना गोळा करून त्यांच्या मोहिमेत सामील केले होते. त्याचप्रमाणे दोन पंच महमद कोलू आणि सादिक दावडा हे सोएबकडून वॉकीटॉकीवर सूचना देत होते. याप्रमाणे अंपायर संथ बॉल अथवा आउट होण्यास सांगत होते. तर, सोएबे टेलिग्रामवर रशियातील असिफ महमदच्या संपर्कात होता. तो तेथील स्पर्धेत सट्टेबाजीचे आयोजन करत असे.

पोलिसांच्या म्हणण्यानुसार, रशियात बसलेला असिफ महमद हा क्रिकेट घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार होता. या टोळीला रशियातील टव्हर आणि मॉस्को येथून सट्टा मिळाल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com