श्रीलंका दौर्‍यासाठी राहुल द्रविड टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी

श्रीलंका दौर्‍यासाठी राहुल द्रविड टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकपदी

Published by :

भारताचा दिग्गज आणि माजी कर्णधार राहुल द्रविड श्रीलंका दौर्‍यावर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक असणार आहे. बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुलीने ही माहिती दिली.भारत आणि श्रीलंका यांच्यात १३ ते २५ जुलै दरम्यान तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका खेळली जाईल.

श्रीलंकेत होणाऱ्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी द्रविडची नेमणूक करण्यात आली आहे. शिखर धवनच्या नेतृत्वात तीन एकदिवसीय मालिका आणि तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी टीम इंडिया या महिन्याच्या शेवटी श्रीलंका दौर्‍यावर रवाना होईल. त्यासाठी भारतीय खेळाडूंनी मुंबई गाठली आहे. या दौऱ्यापूर्वी खेळाडूंना १४ दिवसांच्या क्वारंटाइन कालावधीत राहावे लागेल.

भारतीय संघ :

शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, हार्दिक पंडय़ा, नितीश राणा, इशान किशन (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), यजुर्वेद्र चहल, राहुल चहर, के. गौतम, कृणाल पंडय़ा, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), दीपक चहर, नवदीप सैनी, चेतन सकारिया.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com