CSK vs GT फायनलपूर्वी अहमदाबादमध्ये पावसाची हजेरी; सामना झालाच नाही तर कोण होणार विजयी?

CSK vs GT फायनलपूर्वी अहमदाबादमध्ये पावसाची हजेरी; सामना झालाच नाही तर कोण होणार विजयी?

आयपीएल 2023 चा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. परंतु, सामन्यापूर्वीच अहमदाबादमध्ये पाऊस सुरू झाला आहे.

अहमदाबाद : आयपीएल 2023 चा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. या सामन्यात गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज आमनेसामने आहेत. हा सामना कोणताही संघ जिंकेल, तो अनेक विक्रम प्रस्थापित करेल. परंतु, सामन्यापूर्वीच अहमदाबादमध्ये पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे नाणेफेक होण्यास उशीर होत आहे. परंतु, सामना झालाच नाही तर कोण विजयी होणार याची उत्सुकता सर्वांना आहे.

गुजरात टायटन्सने क्वालिफायर-2 सामन्यात मुंबई इंडियन्सचा 62 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत धडक मारली. दुसरीकडे, क्वालिफायर-1 मध्ये चेन्नई सुपर किंग्जने गुजरात टायटन्सचा 15 धावांनी पराभव करून विजेतेपदाच्या सामन्यात प्रवेश केला. परंतु, या अंतिम सामन्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. या सामन्यासाठी कोणताही राखीव दिवस ठेवण्यात आलेला नाही. अशा स्थितीत पावसामुळे 10.20 पर्यंत खेळ सुरू झाल्यास षटकांमध्ये कोणतीही घट होणार नाही. यानंतरही, पाऊस सुरुच राहिला तर 5-5 षटकांसाठी सामन्याची कट ऑफ वेळ 12.26 पर्यंत असेल.अशातही सामना झालाच नाही तर गुजरात टायटन्सचा संघ विजेतेपद पटकावणार आहे.

नियमांनुसार, गुजरात टायटन्सने पॉइंट टेबलमध्ये अव्वल स्थान पटकावले आहे, तर चेन्नई सुपर किंग्सने दुसरे स्थान मिळविले आहे. गुजरातने 14 पैकी 10 सामने जिंकले आणि 20 गुण मिळवले आणि 0.809 चा नेट-रन रेट होता. दुसरीकडे, सीएसकेने 14 पैकी 8 सामने जिंकले होते आणि त्यांचे 17 गुण होते.

सामन्यातील दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग-11

गुजरात टायटन्स: शुभमन गिल, वृद्धिमान साहा (यष्टीरक्षक), साई सुदर्शन, हार्दिक पांड्या (कर्णधार), विजय शंकर, डेव्हिड मिलर, राहुल तेवतिया, रशीद खान, नूर अहमद, मोहम्मद शमी आणि मोहित शर्मा.

चेन्नई सुपर किंग्ज: डेव्हॉन कॉनवे, ऋतुराज गायकवाड, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, अंबाती रायुडू/मथिशा पाथीराना, मोईन अली, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार/विकेटकीपर), दीपक चहर, तुषार देशपांडे आणि महेश टेकशन.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com