भारताच्या पराभवानंतर रोहित शर्माला अश्रू अनावर; पाहा व्हिडिओ

भारताच्या पराभवानंतर रोहित शर्माला अश्रू अनावर; पाहा व्हिडिओ

T-20 विश्वचषकाचा सेमी फायनल सामना रंगला. या सामन्यामध्ये भारत विरुद्ध इंग्लंड असा थरार पाहायला मिळाला. इंग्लंडने नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

T-20 विश्वचषकाचा सेमी फायनल सामना रंगला. या सामन्यामध्ये भारत विरुद्ध इंग्लंड असा थरार पाहायला मिळाला. इंग्लंडने नाणेफेक जिंकल्यानंतर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने प्रथम फलंदाजी करताना 168 धावा केल्या. तर, इंग्लंडसमोर 169 धावांचं आवहन ठेवलं. इंग्लंडने फलंदाजी करताना एकही गडी न गमावता जॉस बटलर व अलेक्स हेल्स या दोघांच्या अप्रतिम खेळीच्या बळावर 169 धावांचं आवाहन सहज पेलून विजय मिळवला

भारताने 2007 नंतर टी20 वर्ल्डकप जिंकला नाही. टीम इंडियाच्या या मोठ्या पराभवानंतर चाहत्यांसह कर्णधार रोहित शर्माला अश्रू अनावर झाले. रोहित पराभवानंतर मैदानाच्या बाहेर जाऊन डगआऊट मध्ये येऊन बसला. त्यावेळी रोहितचे डोळे पाणावले. त्याचदरम्यान राहुल द्रविड रोहितच्या जवळ येऊन बसला आणि रोहीतला सांभाळले.

रोहित शर्माने म्हटलं, मी खूप नाराज आहे. आम्ही खूप मेहनत घेऊन धावसंख्या रचली. नॉकआऊट मध्ये दबाव कशाप्रकारे असू शकतो, हे फक्त या गोष्टींवरून समजतं. शांत राहण्याची गरज आहे. आम्ही सुरुवातीलाच घाबरलो होतो. त्यांच्या सलामीवीरांना श्रेय दिलं पाहिजे. असे रोहीतने म्हटले आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com