फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये संजू सॅमसनचा जलवा

फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये संजू सॅमसनचा जलवा

कतारमध्ये सुरु असेलेल्या फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये संजू सॅमसनच्या चाहत्यांनी त्याला समर्थन केले आहे.

भारतीय क्रिकेट संघ वेगवेगळ्या कारणाने चर्चेत आहेत. त्यातच या कारणांमुळे सध्या आपल्या फॅन्सच्या निशाण्यावर आहे. T20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये लाजीरवाणा पराभव, खेळाडूंचे खराब प्रदर्शन अशी काही कारणे आहेत. टीम मॅनेजमेंटवर प्रश्नचिन्ह निर्माण झालय. मात्र, या दरम्यान, संजू सॅमसनला टीम इंडियात पुरेशी संधी मिळत नाही. त्यामुळे त्यांचे चाहते नाराज आहे. परंतु, कतारमध्ये सुरु असेलेल्या फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये संजू सॅमसनच्या चाहत्यांनी त्याला समर्थन केले आहे.

कतार येथे सुरु असलेल्या फुटबॉल वर्ल्ड कपमध्ये भले भारतीय टीम खेळत नाहीय. पण भारतीय फुटबॉल चाहते तिथे सामने पाहण्यासाठी गेले आहेत. काही फॅन्सनी भारतीय क्रिकेटपटूंबद्दलच आपलं प्रेमही व्यक्त केलय. अलीकडेच चेन्नई सुपर किंग्सचा कॅप्टन एमएस धोनीची जर्सी घेऊन एक फॅन ब्राझीलच्या सामन्याला उपस्थित होता. आता संजू सॅमसनच्या चाहत्यांनी त्याच्याबद्दल भावना व्यक्त केल्या आहेत. संजू सॅमसनच्या चाहत्यांनी त्याच्या फोटोचे काही पोस्टर छापले आहेत. हे पोस्टर्स घेऊन ते कतारच्या स्टेडियममध्ये पोहोचले. राजस्थान रॉयल्सने हे फोटो आपल्या टि्वटर अकाऊंटवर पोस्ट केलेत. त्यामुळे या फोटोंची प्रचंड चर्चा होत आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com