‘देशासाठी असे करून आनंद वाटला’, पहिल्यांदाच सामनावीर बनल्यानंतर संजू सॅमसन म्हणाला...
Admin

‘देशासाठी असे करून आनंद वाटला’, पहिल्यांदाच सामनावीर बनल्यानंतर संजू सॅमसन म्हणाला...

सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर असलेला भारतीय संघ जोरदार कामगिरी करत आहे. भारताने मालिकेतील पहिल्या सामन्यानंतर दुसरा सामना देखील ५ विकेट्स राखून जिंकला. भारताचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन याने सर्वाधिक धावांचे योगदान दिले आणि यासाठी त्याला सामनावीर पुरस्कारही दिला गेला. संघाला विजय मिळवून दिली.
Published by :
Siddhi Naringrekar

सध्या झिम्बाब्वे दौऱ्यावर असलेला भारतीय संघ जोरदार कामगिरी करत आहे. भारताने मालिकेतील पहिल्या सामन्यानंतर दुसरा सामना देखील ५ विकेट्स राखून जिंकला. भारताचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन याने सर्वाधिक धावांचे योगदान दिले आणि यासाठी त्याला सामनावीर पुरस्कारही दिला गेला. संघाला विजय मिळवून दिली.

पहिल्यांदाच सामनावीर बनल्यानंतर संजू सॅमसन म्हणाला की, “तुम्ही मध्ये कितीही वेळ घालवा, यामुळे चांगले वाटते. देशासाठी असे करणे अजून खास बाब आहे. मी तीन झेल घेतले, पण स्टंपिंग करताना चुकलो. मी यष्टीरक्षण आणि फलंदाजीचा आनंद घेत आहे. मला वाटते की भारतीय गोलंदाज चांगली गोलंदाजी करत आहेत. माझ्या हातात अनेक चेंडू आले आहेत.” शार्दुल ठाकुरने या सामन्यात भारतासाठी सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.

संजू सॅमसन या सामन्यात ३९ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ४३ धावांचे योगदान देऊ शकला. केएल राहुल (१) आणि इशान किशन (६) स्वस्तात बाद झाल्यानंतर सॅमसनने डाव सांभाळला आणि सामन्याचा शेवट देखील केला. देशासाठी चांगले प्रदर्शन करता आल्यामुळे सॅमसन आनंदी आहे. त्याने बोलताना भारतीय गोलंदाजांचे देखील कौतुक केले. दरम्यान, ही पहिलीच वेळ जेव्हा सॅमसन भारताचे प्रतिनिधित्व करताना सामनावीर ठरला आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com