Sourav Ganguly
Sourav GangulyTeam Lokshahi

BCCI अध्यक्षपदावरून निघण्याबाबत सौरव गांगुली म्हणाला...

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अध्यक्षपदावरून माजी कर्णधार सौरव गांगुली निघणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे.
Published by :
Vikrant Shinde

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) अध्यक्षपदावरून माजी कर्णधार सौरव गांगुली निघणार हे जवळपास निश्चित मानलं जात आहे. त्याच्या जागी 1983 च्या विश्वचषक विजेत्या रॉजर बिन्नीचं नाव आघाडीवर आहे. या सर्व चर्चांदरम्यान, गांगुलीने प्रथमच आपलं मौन तोडलं आणि सांगितले की "मला स्वतःवर विश्वास आहे. मी आणखी काही करू शकतो."

Sourav Ganguly
"... तर मी तेव्हाच भुजबळांना कामाला लावलं असतं" उद्धव ठाकरे

काय म्हणाला गांगुली?

'मी प्रशासक झालो आहे. मी वेगळं काही करेन. आयुष्य म्हणजे फक्त तुमचा स्वतःवर असलेला विश्वास आहे. प्रत्येकजण परीक्षा देतो. यातही प्रत्येकजण अपयशी ठरतो, पण या सगळ्यामध्ये उरतो तो फक्त स्वतःवरचा विश्वास.

त्यामुळे आता सौरव गांगुली हा काहीच दिवसांपुरता BCCI चा अध्यक्ष असणार आहे हे स्पष्ट झालं आहे. आता गांगुलीनंतर BCCI च्या अध्यक्षपदाची धुरा आता कोण सांभाळणार हे पाहणं गरजेचं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com