विराटच्या शतकानंतर अनुष्का शर्माची  खास पोस्ट
Admin

विराटच्या शतकानंतर अनुष्का शर्माची खास पोस्ट

आशिया कप 2022 मधून भारतीय क्रिकेट संघ हा आधीच बाहेर पडल्यानंतर अफगाणिस्तान विरुद्ध झालेल्या औपचारिक सामन्यामध्ये भारताने दणदणीत विजय मिळवला.

आशिया कप 2022 मधून भारतीय क्रिकेट संघ हा आधीच बाहेर पडल्यानंतर अफगाणिस्तान विरुद्ध झालेल्या औपचारिक सामन्यामध्ये भारताने दणदणीत विजय मिळवला. आशिया चषक 2022 मध्ये त्याने गुरुवारी दुबईमध्ये अफगाणिस्तानविरुद्ध 1020 दिवसांची प्रतीक्षा संपवली जेव्हा त्याने केवळ 61 बॉल्समध्ये नाबाद 122 रन्स ठोकले. कोहलीने त्याचे 71 वं आंतरराष्ट्रीय शतक झळकावून ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगची बरोबरी केली आहे. कोहलीने जवळपास तीन वर्षांच्या खराब फॉर्मनंतर त्याचं पहिलं शतक झळकावलं.

विराटच्या या शतकानंतर त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्माने त्याच्यासाठी खास पोस्ट शेअर केली आहे. तिने पोस्टमध्ये लिहिली की, मी सदैव आणि प्रत्येक गोष्टीत नेहमीच तुझ्यासोबत असेन. त्यासोबत तिने हार्ट इमोजीही जोडलं आहे.

शतक केल्यानंतर विराट म्हणाला की, "गेल्या अडीच वर्षांनी मला खूप काही शिकवलं आहे. मी आता एका महिन्यात 34 वर्षांचा होणार आहे. त्यामुळे हे शतक माझ्यासाठी स्पेशल आहे. दरम्यान या काळात मला संघाने चांगली मदत केली. मी सहा आठवड्यांची सुट्टी घेतली होती. या सुट्टीमध्ये मी किती थकलो आहे, हे मला जाणवलं. या एका ब्रेकमुळे मला पुन्हा एकदा खेळाचा आनंद लुटता आला."

विराटच्या शतकानंतर अनुष्का शर्माची  खास पोस्ट
Virat Kohli Century Against Afghanistan: किंग कोहलीची 'विराट' खेळी! संघ आधीच बाहेर तरीही विराटचं शतक का होतं महत्वाचं?
Lokshahi
www.lokshahi.com