इसुरू उदानाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

इसुरू उदानाची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

Published by :

श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज इसुरू उदानाने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. श्रीलंका क्रिकेट बोर्डाने ही माहिती दिली आहे.

३३ वर्षीय उदाना अलीकडेच भारताविरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेचा एक भाग होता. ज्यात त्याला एकदिवसीय आणि टी-२० मालिकेत एकही विकेट घेता आली नाही. सप्टेंबरच्या सुरुवातीला श्रीलंकेला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध एकदिवसीय आणि टी-२० मालिका खेळायची आहे. त्यानंतर टी-२० विश्वचषक होणार आहे, अशा परिस्थितीत उदानाचे जाणे श्रीलंका संघासाठी मोठे नुकसान ठरू शकते.

दरम्यान २००९मध्ये पदार्पण केलेल्या उदानाने श्रीलंकेसाठी अनुक्रमे २१ वनडे आणि ३५ टी-२० सामने खेळले आहेत. यात त्याने अनुक्रमे १८ आणि २७ बळी टिपले आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com