IND vs BAN 2nd Test
IND vs BAN 2nd TestTeam Lokshahi

भारतीय संघाने 227 धावांवर बांगलादेशचा आटोपला पहिला डाव

दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना बांगलादेश संघाने 227 धावा केल्या.
Published by :
shamal ghanekar

भारत आणि बांगलादेश (India vs Bangladesh) संघात दुसरा कसोटी सामना ढाका येथे खेळला जात असून सामन्याचा पहिला दिवस संपला आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यामध्ये नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना बांगलादेश संघाने 227 धावा केल्या. त्यानंतर भारत संघ फलंदाजी करण्यासाठी मैदानात उतरला आहे. सलामीवीर केएल राहुल आणि शुभमन गिल फलंदाजी करत आहेत.

बांगलादेश संघाकडून मोमिनुल हकने चांगली फलंदाजी केली असून त्याने १५७ चेंडू ८४ धावा करण्यात यश मिळाले. यामध्ये त्याने १२ चौकार आणि १ षटकार लगावला आहे. तर त्याचबरोबर मुशफिकर रहीम २६, लिटन दास २५ धावा करण्यात यश मिळाले. त्यामुळे बांगलादेश संघाला 227 धावांचा टप्पा गाठता आला आहे.

IND vs BAN 2nd Test
IND Vs BAN: बांगलादेशविरुद्धच्या अटीतटीच्या सामन्यात भारताचा दणदणीत विजय

तर, भारताकडून गोलंदाजी करताना उमेश यादव आणि आर आश्विन या दोघांनीही 4 विकेट्स घेतल्या. उमेश यादव २५ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. तर आश्विनने ७१ धावा देत ४ विकेट्स घेतल्या आहेत. तसेच कसोटी संघात पदार्पण करणाऱ्या जयदेव उनाडकटनेही २ विकेट्स घेतल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com