उद्या होणार सामना अन् भारताच्या प्रमुख खेळाडूने दुखापतीमुळे घेतली माघार
Admin

उद्या होणार सामना अन् भारताच्या प्रमुख खेळाडूने दुखापतीमुळे घेतली माघार

द्विदेशीय मालिकांचे सत्र सुरू झाले आहे. भारतीय संघ तीन वन डे व दोन कसोटी सामन्यांची मालिका बांगलादेश दौऱ्यावर आहे
Published by :
Siddhi Naringrekar

द्विदेशीय मालिकांचे सत्र सुरू झाले आहे. भारतीय संघ तीन वन डे व दोन कसोटी सामन्यांची मालिका बांगलादेश दौऱ्यावर आहे आणि उद्या या दौऱ्यातील पहिला वन डे सामना खेळवला जाणार आहे. मात्र या सामन्यापूर्वी एक मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे वर्ल्ड कप स्पर्धेतून भारताच्या ट्वेंटी-२० संघात पुनरागमन करणाऱ्या मोहम्मद शमीला बांगलादेश दौऱ्यातून हाताच्या दुखापतीमुळे माघार घ्यावी लागली आहे. याची माहिती एका वृत्तसंस्थेने दिली आहे.

BCCI ने अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही आहे. सामने सकाळी ११.३० वाजल्यापासून सुरू होतील, तर कसोटीचे सामने सकाळी ९ पाहून खेळवण्यात येतील.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com