आज न्यूझीलंड-श्रीलंका येणार आमने-सामने, कधी, कुठे पाहाल सामना?
Admin

आज न्यूझीलंड-श्रीलंका येणार आमने-सामने, कधी, कुठे पाहाल सामना?

टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत आज न्यूझीलंड आणि श्रीलंका हे दोन्ही संघ आमने-सामने येणार आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar

टी20 विश्वचषक 2022 स्पर्धेत आज न्यूझीलंड आणि श्रीलंका हे दोन्ही संघ आमने-सामने येणार आहेत. हा सामना आज अर्थात 29 ऑक्टोबर रोजी खेळवला जाईल. भारतीय प्रमाण वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता सामना सुरु होईल. सामना सुरु होण्यापूर्वी अर्धातास नाणेफेक होणार आहे.

विश्वचषक स्पर्धेत शुक्रवारी अर्थात 28 ऑक्टोबरला ग्रुप 1 मधील अफगाणिस्तान विरुद्ध आयर्लंड आणि इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया असे दोन सामने रंगणार होते. पण मेलबर्नमध्ये होणाऱ्या तुफान पावसामुळे दोन्ही सामने रद्द करण्यात आले आहेत.

हा सामना ऑस्ट्रेलियाच्या सिडनी क्रिकेट स्टेडियम येथे खेळवला जाणार आहे. या सामन्याचं लाईव्ह टेलिकास्ट स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध चॅनलवर होईल. तसेच डिज्नी+ हॉटस्टार अॅपद्वारे या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग पाहता येऊ शकतं.

आज न्यूझीलंड-श्रीलंका येणार आमने-सामने, कधी, कुठे पाहाल सामना?
गाढवालाही बाप बनवायचा असता तर मी बनवला असता : वसीम अक्रम
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com