U-19 Women’s WC Final
U-19 Women’s WC Final Team Lokshahi

U-19 Women’s WC : रचला इतिहास, इंग्लंडला मात देत विश्वचषकावर कोरले भारताचं नाव

विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताने सात विकेट्सने मिळवला मोठा विजय

संपूर्ण भारतासाठी मोठी आनंदाची बातमीसमोर आली आहे. क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच पार पडणाऱ्या अंडर-19 महिला T20 विश्वचषकावर महिला संघाने भारताचे नाव कोरले आहे. आजच्या या अंतिम सामन्यात इंग्लंडला 7 विकेट्सने विजय मिळवून सामना आणि विश्वचषक दोन्ही आपल्या नावी केला आहे. नाणेफेक जिंकून भारतीय संघाने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मैदानात फलंदाजी करण्यासाठी उतरलेला इंग्लंड संघ अवघ्या 68 धावांत गुंडाळला गेला. या माफक आव्हानसोबत भारतीय संघ मैदानात उतरला आणि तीन विकेट्सच्या बदल्यात 14 षटकात पूर्ण करत सामना आणि विश्वचषक जिंकला आहे.

इंग्लंडने ठेवलेल्या केवळ 69 धावांचा पाठलाग करताना भारताची चांगली सुरुवात झाली मात्र 16 धावांवर कर्णधार शफाली वर्माला 15 (11) हन्ना बेकरने अलेक्सा स्टोनहाउसकरवी झेलबाद केले. त्यापाठोपाठ सलामीवीर श्वेता देखील केवळ 5(6) धावा करून बाद झाली. त्यानंतर आलेल्या सौम्या तिवारी आणि त्रिशा गोंगडी यांच्यात 46 धावांची भागीदारी झाली. मात्र 24(29) करून त्रिशा बाद झाली. सौम्याने 37 चेंडूत 24 धावा करून पहिल्या-वहिल्या अंडर-19 विश्वचषकात पहिला विजय मिळवून दिला.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com