Vinod Kambli
Vinod KambliTeam Lokshahi

विनोद कांबळी पुन्हा एकदा वादात! दारूच्या नशेत पत्नीवर फेकले...; पोलिसांत गुन्हा दाखल

भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी पुन्हा एकदा वादात सापडला आहे. विनोद कांबळी यांच्या पत्नी अँड्रिया हेविटने आरोप केले आहे

मुंबई : भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी पुन्हा एकदा वादात सापडला आहे. विनोद कांबळी यांच्या पत्नी अँड्रिया हेविटने त्यांच्यावर दारूच्या नशेत मारहाण केल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी विनोद कांबळी यांच्या पत्नीने मुंबईतील वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

माहितीनुसार, शुक्रवारी दुपारी 1 ते 1.30 च्या दरम्यान विनोद कांबळी मद्यधुंद अवस्थेत त्याच्या वांद्रे फ्लॅटवर पोहोचला आणि त्याने त्याच्या पत्नीला शिवीगाळ केली. विनोद कांबळी यांनी मद्यधुंद अवस्थेत स्वयंपाकाच्या पॅनचे हँडल पत्नीवर फेकले. त्यामुळे तिच्या डोक्याला दुखापत झाल्याचा आरोप पत्नीने केला आहे. याप्रकरणी विनोद कांबळी यांनी निवेदन दिले असून, त्यांना याबाबत कोणतीही माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. वांद्रे पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, पोलिस येण्यापूर्वी विनोद कांबळी यांच्या पत्नीने भाभा रुग्णालयात उपचार घेतले.

दरम्यान, विनोद कांबळी यांचा वादांशी जुना संबंध आहे. काही काळापूर्वी त्यांनी एका मुलाखतीत नोकरीबद्दल बोलले होते. कांबळीने सांगितले होते की, माझ्याकडे कोणतेही काम नाही आणि ते फक्त बीसीसीआयच्या पेन्शनवर जगत आहेत. विनोद कांबळीने भारताकडून 17 कसोटी सामने खेळले असून, त्यात त्याच्या नावावर 1084 धावा आहेत. तर त्याने 104 एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतासाठी 2477 धावा केल्या आहेत. विनोद कांबळी 2000 साली भारताकडून शेवटचा सामना खेळला होता.

Vinod Kambli
ऑस्ट्रेलिया सोबतच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ सज्ज; जाणून घ्या सविस्तर माहिती
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com