maharashtra kesari 2023
maharashtra kesari 2023Team Lokshahi

कोण होणार 65 वा महाराष्ट्र केसरी, या दोन मल्लांची अंतिम सामन्यात धडक

या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यांचा थरार बघायला प्रचंड लोक त्या ठिकाणी आले आहेत.
Published by :
Sagar Pradhan

आज पुण्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा पार पडत आहे. या महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या अंतिम सामन्यांचा थरार बघायला प्रचंड लोक त्या ठिकाणी आले आहेत. महाराष्ट्र केसरी महाराष्ट्रातील पैलवानांसाठी प्रतिष्ठेची स्पर्धा आहे. या स्पर्धेतून आज महाराष्ट्राला 64वा महाराष्ट्र केसरी पैलवान मिळणार आहे. त्यासाठी चार जबरदस्त आणि ताकदवान मल्लांनी उपांत्य फेरीत प्रवेश केलेला होता. त्यांच्यामध्ये चुरशीची लढत होऊन 64 वा महाराष्ट्र केसरी पैलवान मिळणार आहे.

maharashtra kesari 2023
कोणीही पोटदुखी करून घेऊ नये, का म्हणाले आदित्य ठाकरेंना केसरकर असे?

राज्यभरातून शेकडो पैलवान या ठिकाणी आपलं नशिब आजमवतात. अतिशय मेहनत करुन, प्रत्येक फेरीतून पास होऊन मल्ल या स्पर्धेत पुढे येतात. पुण्यात सुरु असलेल्या या स्पर्धेचा आज शेवटचा दिवस आहे. विशेष म्हणजे त्यासाठी दोन उपांत्या फेरी देखील पार पडल्या आहेत आणि अंतिम सामन्याचा थरार थोड्याच वेळात सुरु होण्याची शक्यता आहे. मॅट विभागातील शिवराज राक्षे आणि माती विभागातील पुण्याचा महेंद्र गायकवाड यांनी अंतिम लढतीत विजय मिळवला आहे. तर मॅट विभागातील नांदेडचा शिवराज राक्षे आणि नाशिकचा हर्षवर्धन सदगीर यांच्या चुरशीच्या लढतीत नांदेडचा शिवराज राक्षे याने बाजी मारली.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com