Women’s T20 Asia Cup : महिला आशिया चषकाचे संघ जाहीर

Women’s T20 Asia Cup : महिला आशिया चषकाचे संघ जाहीर

महिला आशिया चषक 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेत आशिया खंडातील सात संघ सहभागी होत आहेत. या स्पर्धेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याची माहिती आयसीसीनं दिली आहे.

महिला आशिया चषक 1 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेत आशिया खंडातील सात संघ सहभागी होत आहेत. या स्पर्धेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. याची माहिती आयसीसीनं दिली आहे. या स्पर्धेसाठी भारत आणि पाकिस्तान यांच्यासह बहुतेक देशांनी आपपल्या संघाची घोषणा केलीय. ही स्पर्धेतील पहिला सामना बांग्लादेश आणि थायलंड यांच्यात 1 ऑक्टोबरला खेळला जाणार आहे. तर, 15 ऑक्टोबरला या स्पर्धेतील अंतिम सामना होणार आहे.

आगामी महिला आशिया चषकात हरमनप्रीत कौर भारतीय संघाची धुरा संभाळणार आहे. तर, स्मृती मानधनाच्या खांद्यावर उप-कर्णधार पदाची जबाबदारी असेल. याशिवाय, रिचा घोषची भारताच्या संघात विकेटकिपर म्हणून निवड करण्यात आलीय. दिप्ती शर्मा, शेफाली वर्मा यांच्यासह जेमिमा रोड्रिग्ज आणि सबिनेनी मेघना यांनाही संधी देण्यात आलीय. महत्वाचं म्हणजे, यास्तिका भाटियाला या स्पर्धेत भारतीय संघात जागा मिळाली नाही.

या स्पर्धेत छोट्या संघांचा समावेश केल्यास तेथील क्रिकेटला चालना देण्यासाठी फायदा होईल. सहयोगी संघांना या स्पर्धेत खेळण्याची उत्तम संधी आहे. काही निवडक संघच विजेतेपदाचे दावेदार आहेत. येथे आम्ही सातही संघांचे पथक देत आहोत. असे आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष जय शाह यांनी सांगितले.

भारत संघ

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना, दीप्ती शर्मा, शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, सबीनीन मेघना, रिचा घोष, स्नेह राणा, दयालन हेमलता, मेघना सिंग, रेणुका ठाकूर, पूजा वस्त्राकर, राजेश्वरी गायकवाड, किरण यादव, किरण यादव.

राखीव खेळाडू : तानिया भाटिया, सिमरन बहादूर.

पाकिस्तान संघ

बिस्माह मारूफ (कर्णधार), एमेन अन्वर, आलिया रियाझ, आयेशा नसीम, ​​डायना बेग, कैनत इम्तियाज, मुनिबा अली, निदा दार, ओमामा सोहेल, सदफ शमास, सादिया इक्बाल, सिद्रा अमीन, सिद्रा नवाज, तुबा हसन.

राखीव खेळाडू: नशरा सुंधू, नतालिया परवेझ, उम्मे हानी, वहिदा अख्तर.

बांग्लादेश संघ

निगार सुलताना (कर्णधार), शमीमा सुलताना, फरगाना हक पिंकी, रुमाना अहमद, रितू मोनी, लता मंडल, सलमा खातून, शोभना मोस्त्री, नाहिदा अख्तर, मुर्शिदा खातून, जहाँआरा आलम, फहिमा खातून, संजीदा अख्तर, फरीहा अख्तर, शोहा अख्तर.

राखीव खेळाडू: मारुफा अख्तर, शर्मीन अख्तर सुप्ता, नुजहत तस्निया, राबेया खान

थायलंड संघ

सोर्नारेन टिपोच, नट्टाया बूचथम, नरुमोल चाईवई, नन्नापत कोंचरोएनकाई, नट्टाकन चांटम, रोसेनन कानोह, ओनिचा कामचोम्फू, फन्निता माया, थिपाचा पुथावोंग, नन्थिता बूनसुखम, सुवानन खियापो, लाओटोन सुवानो सुवानो, लाओटोन सुवानो

श्रीलंका

चमारी अटापट्टू (कर्णधार), हसिनी परेरा, हर्षिता समरविक्रमा, कविशा दिलहारी, निलाक्षी डी सिल्वा, अनुष्का संजीवनी, कौशिनी नुथ्यांगा, ओशाधी रणसिंघे, मलशा शेहानी, मधुशिका मेथानंदा, इनोका रणवीरा, रश्मी सिल्वा, सुगानी कुमारी,

Women’s T20 Asia Cup : महिला आशिया चषकाचे संघ जाहीर
फिफा फूटबॉल वर्ल्डकपसाठी कतार सज्ज
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com