WPL च्या पहिल्याच लिलावात महिला क्रिकेटपटू झाल्या मालामाल; मुंबईच्या टीममध्ये कुठले खेळाडू? जाणून घ्या पूर्ण लिस्ट
Admin

WPL च्या पहिल्याच लिलावात महिला क्रिकेटपटू झाल्या मालामाल; मुंबईच्या टीममध्ये कुठले खेळाडू? जाणून घ्या पूर्ण लिस्ट

महिला प्रीमियर लीगची सर्व तयारी जवळपास पूर्ण झाली आहे.
Published by :
Siddhi Naringrekar

महिला प्रीमियर लीगची सर्व तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. या स्पर्धेच्या पहिल्या सीझनसाठी आज (१३ फेब्रुवारी) मुंबईत ऑक्शन पार पडले.स्पर्धेचा पहिला हंगाम ४ मार्चपासून सुरू होणार आहे. ही स्पर्धा २६ मार्चपर्यंत खेळवली जाणार आहे. यामध्ये एकूण २२ सामने खेळवले जाणार आहेत.

प्रथमच महिला खेळाडूंचा लिलाव झाला. यामध्ये ४०९ खेळाडूंची निवड करण्यात आली होती. पण त्यापैकी केवळ ८७ खेळाडूंवर बोली लागली. या लिलावात फ्रँचायझींनी २० खेळाडूंवर १ कोटी किंवा त्याहून अधिक रुपयांची बोली लावली. यापैकी ४ खेळाडूंना फ्रँचायझींनी २ कोटी ते २ कोटी रुपयांमध्ये आणि ३ खेळाडूंना ३ कोटींहून अधिक रुपयांना खरेदी केले. स्मृती मानधना (RCB) लिलावात सर्वात महागडी ठरली. तिला ३.४० कोटींची बोली लागली.

लिलावाच्या दिवशी टीमच्या मालक नीता अंबानी या सुद्धा लिलाव प्रक्रियेत सहभागी झाल्या होत्या. मुंबई इंडियन्स आणि यूपी वॉरियर्स या दोन टीम्सनी खेळाडूंवर सर्व पैसे खर्च केले.

WPL साठी मुंबई इंडियन्सची टीम

1 हरमनप्रीत कौर- 1.80 कोटी रुपये

2 यास्तिका भाटिया- 1.50 कोटी रुपये

3 पूजा वस्त्राकर- 1.90 कोटी रुपये

4 एमेली केर- 1 कोटी रुपये

5 नेट सिवर- 3.20 कोटी

6 धारा गुज्जर- 10 लाख

7 साइका इशाक- 10 लाख

8 अमनजोत कौर -50 लाख

9 इसी वॉंग- 30 लाख

10 हीथर ग्राहम -30 लाख

11 हेली मैथ्यूज – 40 लाख

12 शोले ट्रायन- 30 लाख

13 हुमैरा काजी- 10 लाख

14 प्रियंका बाला- 20 लाख

15 सोनम यादव- 10 लाख

16 नीलम बिष्ट-10 लाख

17 जिनटीमानी कालिटा-10 लाख

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com