महाबळेश्वर तालुक्यात अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार
महाबळेश्वर तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर 15 जणांनी अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबप्रकरणी अल्पवयीन मुलीच्या आईच्या तक्रारीवरून सागर उर्फ आबा हनुमंत गायकवाड वय ३० व आशुतोष मोहन बिरामणे वय २२ रा. मुन्नवर हौ.सोसा, महाबळेश्वर यांना पोलिसांनी ताब्यात घेत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या दोघांना सातारा येथील जिल्हा विशेष सत्र न्यायालयाने २७ सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे तर, गुरुवारी या प्रकरणात सहभागी असलेल्या आणखी १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी तात्काळ कारवाई करत दोन मुख्य आरोपींसह १३ जणांवर POSCO कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपींमध्ये महाबळेश्वर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष आणि शिवसेना नेते डी.एम.बावळेकर यांच्या सात्विक आणि योगेश या दोन मुलांचाही समावेश आहे.
आतापर्यंत या प्रकरणात महाबळेश्वर पोलिसांनी मुख्य आरोपी सागर गायकवाड, आशुतोष बिरामणे, संजयकुमार जंगम, घनश्याम फरांदे, प्रभाकर हिरवे यांना अटक केली असून इतर आरोपींना अटक करण्यासाठी पथकं रवाना केली आहेत. फरार आरोपींमध्ये एका शिवसेना नेत्याच्या मुलांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. आरोपींचा शोध सुरू असून मुंबईसाठी पोलिसांचो एक पथक रवाना झाले आहे.