पुणे
Pune Accident : पुण्यातील बंड गार्डन मेट्रो स्टेशनजवळ भीषण अपघात; 2 जणांचा मृत्यू तर एक जखमी, अपघाताचा सीसीटीव्ही समोर
अपघाताचा सीसीटीव्ही समोर
थोडक्यात
पुण्यातील बंड गार्डन मेट्रो स्टेशनजवळ भीषण अपघात
2 जणांचा जागीच मृत्यू तर एक जखमी
अपघाताचा सीसीटीव्ही समोर
(Pune Accident) पुण्यातील बंड गार्डन मेट्रो स्टेशनजवळ भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात 2 जणांचा जागीच मृत्यू तर एक जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात पहाटेच्या सुमारास बंडगार्डन मेट्रो स्टेशनजवळ हा भीषण अपघात झाला असून गाडीतला तिसरा युवक गंभीर जखमी असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
भरधाव कार मेट्रो स्टेशनच्या खाली पिलरला धडकल्याची माहिती आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या अपघाताचा सीसीटीव्ही आता समोर आला असू अपघात कसा झाला याचा तपासणी कोरेगाव पार्क पोलीस स्टेशनकडून सुरू आहे.
