Pune Crime
Pune Crime

Pune Crime : भरदिवसा विश्रांतवाडीत एकावर कोयत्याने हल्ला; दोघांना अटक, एक फरार

पुण्यात भरदिवसा एकावर थेट कोयत्याने हल्ला झाल्याची आणखी एक घटना समोर आली आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

(Pune Crime ) पुण्यात भरदिवसा एकावर थेट कोयत्याने हल्ला झाल्याची आणखी एक घटना समोर आली आहे. शहरात अशा प्रकारच्या हिंसक घटनांमध्ये वाढ होताना दिसत असून, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.

विश्रांतवाडी परिसरात घडलेल्या या घटनेत नरेश रामचंद्र तिडंगे (वय ४०) या व्यक्तीवर तिघांनी एकत्र येत कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. बुधवारी रात्री आठच्या सुमारास, तिडंगे हे कामावरून परत येत असताना, त्यांना रस्त्यात अडवून हल्ला करण्यात आला.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी तत्काळ मदतीला धाव घेतल्याने आरोपींनी तिथून पळ काढला. मात्र, या हल्ल्यात तिडंगे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

या प्रकरणी पोलिसांनी त्वरीत कारवाई करत दोघांना अटक केली असून, तिसरा आरोपी सध्या फरार आहे. अटक केलेले आरोपी हे विश्रांतवाडी परिसरातीलच असल्याची माहिती आहे. पोलिसांकडून हल्ल्याचं कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पुढील तपास केला जात आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com