Pune Rain Update
पुणे
Pune Rain Update : पुण्यात पुढच्या 48 तासात अतिमुसळधार पावसाचा इशारा
पुण्यात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे.
(Pune Rain Update ) पुण्यात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू असून याचा शहरातील जनजीवनावर मोठा परिणाम झाला आहे. सकाळच्या वेळेस ऑफिसला निघालेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. शहरातील प्रमुख रस्त्यांवर पाणी साचले असून वाहतूक मंदावली आहे.
शाळा सुरू असल्याने विद्यार्थ्यांनाही पावसाचा त्रास सहन करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर हवामान विभागाने पुण्यासाठी पुढील 48 तास ‘अतिवृष्टी’चा इशारा दिला आहे. त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आहे.
नागरिकांनी आवश्यक असेल, तातडीचे काम असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, अशी विनंती प्रशासनाकडून करण्यात आली आहे.