Pune : आरसीबीच्या चाहत्यांना जल्लोष करणे पडले महागात; 30 - 40 जणांविरोधात गुन्हा दाखल
(Pune)आरसीबीने आयपीएलच्या विजेतेपदावर नाव कोरल्यानंतर देशभरात एकच जल्लोष पाहायला मिळाला. अगदी बंगळुरूपासून ते पुण्यापर्यंत चाहत्यांनी मोठा जल्लोष केला. आरसीबीच्या चाहत्यांनी फटाके उडवत, घोषणाबाजी देत विजय साजरा केला.
मात्र हा जल्लोष करणं आरसीबीच्या चाहत्यांना चांगलंच महागात पडलं आहे. पुण्यातील गुडलक चौकात सेलिब्रेशनसाठी एकत्र जमलेल्या 30-40 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयपीएलमध्ये आरसीबी जिंकल्यावर गुडलक चौकात मोठ्या प्रमाणात गर्दी करण्यात आली आहे. डेक्कन पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
कोणतीही पूर्वसूचना न देता परवानगी न घेता गुडलक चौक डेक्कन पुणे येथील सार्वजनिक रस्त्यावर जल्लोष करीत सार्वजनिक वाहतुकीस अडथळा निर्माण करण्यात आला. फटाके फोडून हुल्लडबाजी करून शांततेचा भंग केला म्हणून 30 ते 40 अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे