Pune
Pune

Pune : Alandi : आळंदी देवस्थानच्या विश्वस्तांचे गैरवर्तन; वारकऱ्यांचा आरोप, व्हिडीओ व्हायरल

पुण्यातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात घडलेल्या एका वादग्रस्त घटनेमुळे सध्या वारकरी संप्रदायामध्ये नाराजीचा सूर उमटत आहे.
Published by :
Team Lokshahi
Published on

( Pune ) पुण्यातील विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात घडलेल्या एका वादग्रस्त घटनेमुळे सध्या वारकरी संप्रदायामध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. आळंदी देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त योगी श्री निरंजन नाथ यांच्यावर वारकरी, पत्रकार आणि पोलिसांशी उद्धट वर्तन केल्याचे आरोप करण्यात आले आहेत. संतांच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर परिसरात ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, निरंजन नाथ हे मंदिरात असताना काही वारकरी व प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी उर्मटपणे बोलल्याचा आरोप आहे. काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, त्यांनी पोलिसांशीसुद्धा अरेरावीची भाषा वापरली. त्या वेळी मंदिरात मोठी गर्दी होती आणि पालखी सोहळ्याच्या पारंपरिक तयारीसाठी वारकरी व पत्रकार उपस्थित होते.

या वर्तनामुळे भक्तांमध्ये अस्वस्थता पसरली असून अनेकांनी सोशल मीडियावरून नाराजी व्यक्त केली आहे. एका ज्येष्ठ वारकऱ्याने प्रतिक्रिया देताना म्हटले, "देवाच्या सेवकांनी जर स्वतःलाच मालक समजायला सुरुवात केली, तर ते सेवा नव्हे, अहंकार होतो." या प्रकाराची माहिती वेगाने पसरत असून वारकरी मंडळांनी मंदिर प्रशासनाकडे याची गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे.

सध्या मंदिर प्रशासनाकडून या प्रकरणावर अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली, तरी परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर शांतता आणि शिस्त राखण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com