BMC : दुबार मतदारांना मुंबई महापालिका नोटीस बजावणार
थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
(BMC ) आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच तयारीला लागल्याचे पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर आता मुंबईतील दुबार मतदारांवर आता मुंबई महानगर पालिकेची करडी नजर असणार असून दुबार मतदारांना मुंबई महापालिका नोटीस बजावणार असल्याची माहिती मिळत आहे.
मतदार यादीत ज्यांचे एकपेक्षा अधिक वेळा नाव आलेले आहे त्यांना नोटीस देऊन त्यांच्याकडून परिशिष्ट 1 भरून घेतले जाणार आहे. महापालिकेचे सहाय्यक आयुक्त याबाबत सर्वेक्षण करणार असून 11 लाखहुन अधिक दुबार मतदारांच्या नोंदी तपासणार जाणार असल्याची माहिती मिळत आहे.
संबंधित मतदार कोणत्या केंद्रावर मतदान करणार हे निश्चित केले जाणार असून मतदानाच्या दिवशी हमीपत्रही घेतले जाणार आहे. दुबार मतदारांचे नाव मतदार यादीतून वगळण्याचे राज्य निवडणूक आयोगाने महानगर पालिकेला आदेश दिले असल्याची माहिती मिळत आहे.
Summery
मुंबईतील दुबार मतदारांवर आता मुंबई महानगर पालिकेची करडी नजर
दुबार मतदारांना मुंबई महापालिका नोटीस बजावणार
महापालिकेचे सहाय्यक आयुक्त सर्वेक्षण करणार
