Election
Election

Election : निवडणुकांबाबत विविध मुद्यांवर तब्बल 36 याचिका; आज मुंबई हायकोर्टात सुनावणी

आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व तयारीला लागले आहेत.
Published by :
Siddhi Naringrekar
Published on

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

(Election) आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व तयारीला लागले आहेत. जिल्हा परिषद आणि महापालिका निवडणुकांचे वेध सर्वांनाच लागले आहेत. राजकीय पक्षांकडून देखील जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे.

यातच आता निवडणुकांबाबत विविध मुद्यांवर तब्बल 36 याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल असून, त्यावर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी पार पडणार आहे. या याचिकांमध्ये मतदार यादीतील त्रुटी आणि प्रभाग आरक्षणाच्या प्रक्रियेवरील आक्षेप मांडण्यात आले आहेत.

मुख्य न्यायमूर्ती श्री. चंद्रशेखर यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी पार पडणार असून या सुनावणीकडे सर्वाचं लक्ष लागले आहे.

Summery

  • आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व तयारीला लागले

  • निवडणुकांबाबत विविध मुद्यांवर तब्बल 36 याचिका

  • 36 याचिकांवर आज मुंबई हायकोर्टात सुनावणी

logo
Lokshahi Marathi News
www.lokshahi.com