अनिल देशमुख यांच्या चौकशीसाठी नेमणार सेवानिवृत्त न्यायमूर्तींची समिती?

अनिल देशमुख यांच्या चौकशीसाठी नेमणार सेवानिवृत्त न्यायमूर्तींची समिती?

Published by :

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्बनंतर आता गृहमंत्री अनिल देशमुख अडचणीत सापडले आहेत. मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार राज्य सरकार आता एक निवृत्त न्यायमूर्तींची चौकशी समिती बनवून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करणार आहे. परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करण्यासाठी राज्य सरकार या समितीवर हायकोर्टाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती नेमण्याची शक्यता आहे.

येत्या काही दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाविकासआघाडी सरकारच्या समन्वय समितीची बैठक बोलावली आहे. त्यावेळी महत्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. येत्या गुरुवारी परमबीर सिंग यांची याचिका सर्वोच्च न्यायालय येईल. त्याच दिवशी समन्वय समितीची बैठक होऊन महत्वाचा निर्णय घोषित होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

परमबीर सिंग न्यायालयात गेले असतील तर चांगली गोष्ट आहे. राज्यसभेत सर्वोच्च न्यायालयचे निवृत्त सरन्यायाधीश रंजन गोगोई सदस्य असून त्यांचं वक्तव्य आपण वाचले. सर्वोच्च न्यायालयात कोणलाही न्याय मिळत नाही, याचा अर्थ सर्वोच्च न्यायालयात दबावात काम करते, असे ते म्हणाले होते.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com