पुण्यातील कोंढवा परिसरात अग्नितांडव; तीन एकर परिसरात पसरली आग

पुण्यातील कोंढवा परिसरात अग्नितांडव पाहायला मिळते आहे. गंगाधाम सोसायटीच्या जवळ असलेल्या काकडे वस्तीत जवळपास तीन एकर परिसरात आग पसरली आहे

चंद्रशेखर भांगे | पुणे : पुण्यातील कोंढवा परिसरात अग्नितांडव पाहायला मिळते आहे. गंगाधाम सोसायटीच्या जवळ असलेल्या काकडे वस्तीत जवळपास तीन एकर परिसरात आग पसरली आहे. धुराचे लोळ दूरपर्यंत पसरले आहेत. साडेआठ ते नऊच्या सुमारास लागलेली आग अजूनही रौद्ररूप धारण करताना पाहायला मिळते. जवळच सोसायटी आणि रहिवासी लोकांची गर्दी आहे. काही इमारती खाली करण्याचा सूचना प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. जवळपास 20 अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com