आर्मीमध्ये भरती होण्याचे स्वप्न स्वप्नच राहिलं! 'या' कारणानं तरुणाने उचललं टोकाचे पाऊल

आर्मीमध्ये भरती होण्याचे स्वप्न स्वप्नच राहिलं! 'या' कारणानं तरुणाने उचललं टोकाचे पाऊल

आर्मीमध्ये भरती होण्याचे स्वप्न बघणाऱ्या एका तरुणाने ड्रिंक अँड ड्राइव्हची केस लागल्यामुळे टोकाचे पाऊल उचलले आहे.

ठाणे : भारतीय लष्कर आणि पोलीस मध्ये भरती होण्याची स्वप्न बघणाऱ्या एका तरुणाने ड्रिंक अँड ड्राइव्हची केस लागल्यामुळे करियर संपलं या नैराश्यातून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात घडली आहे. या घटनेनंतर परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आत्महत्या करणाऱ्या मनीष उतेकर या तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईड नोट लिहून आपल्या आईला पाठवली होती. या सुसाईड नोटमध्ये मनीषने काही वाहतूक पोलिसांची नाव लिहलेली आहे. या प्रकरणी अद्याप कुठलाही गुन्हा दाखल झालेला नसून पुढील तपास पोलीस करत आहेत.

आत्महत्या करणारा मनीष उतेकर हा तरुण ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात राहणार आहे. तसेच तो आर्मी भरती पोलीस भरतीसाठी परीक्षा देत होता. या भारतीय लष्कर आणि पोलीस मध्ये भरती होणाची स्वप्न बघणाऱ्या या मनीषने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. या आत्महत्येआधी मनीषने आपल्या आईच्या मोबाईलवर सुसाईड नोट पाठवली.

या सुसाईड नोट मध्ये मनीषने सांगितले आहे की, आखाच्या दिवशी त्याने आणि त्याच्या मित्राने मद्यपान केले होते. मद्यपान करून वाहन चालवत असताना त्याला वाहतूक पोलिसांनी ठाणे पूर्वेतील कोपरी परिसरात अडवले आणि त्याच्या विरोधात ड्रिंक अँड ड्राइव्हचा गुन्हा दाखल कोर्टात जाण्यास सांगितले. मात्र, पोलिसांची माफी मागून दंड भरतो, असे सांगितले. तर त्यांनी करियर बरबाद करणार असल्याची धमकी दिली असल्याचा आरोप मनीषने सुसाईड नोटमध्ये केला आहे. मात्र कोर्टात गेलो तर आपलं करियर संपून जाईल या नैराश्यातून मनीष उतेकर याने आपल्या राहत्या घरात आईच्या साडीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आत्महत्ये पूर्वी मनीषने काही पोलीस कर्मचाऱ्यांची नाव लिहलेली असून त्यांनी करियर संपवण्याची धमकी दिल्याचा उल्लेख केला आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास करावा, अशी मागणी मनीषच्या कुटुंबीयांनी आणि मित्रमंडळींनी केला आहे. या प्रकरणी पोलीस ठाण्यात रात्री उशिरा पर्यंत कुठल्याही प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता. मात्र या प्रकरणी पोलीस चौकशी सुरु असून चौकशी नंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु होणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com