दारूसाठी चकणा आणला नाही म्हणून तरुण व त्याच्या बहिणीला बेदम मारहाण

दारूसाठी चकणा आणला नाही म्हणून तरुण व त्याच्या बहिणीला बेदम मारहाण

अशोक नगर परिसरात शुक्रवारी रात्री घडला धक्कादायक प्रकार

अमझद खान | कल्याण : दारूसाठी चकणा आणून दिला नाही म्हणून एका अल्पवयीन तरुण आणि त्याचा बहिणीला बेदम मारहाण केल्याची घटना कल्याणमध्ये घडली आहे. मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर आता चांगलाच व्हायरल झाला आहे. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांनी सहा आरोपींना ताब्यात घेतले आहे.

कल्याण पश्चिमेतील उंबर्डे येथील सम्राट अशोक नगर परिसरात शुक्रवारी रात्री एक धक्कादायक प्रकार घडला. परिसरातील एका इमारती खाली काही तरुण दारूची पार्टी करत होते. यादरम्यान रोहन चव्हाण हा तरुण आपली बहीण सोनाली चौरे सोबत काही कामानिमित्त रस्त्यावरुन जात असताना पार्टी करणाऱ्या तरुणांपैकी एकाने रोहनला दहा रुपये दिले आणि दुकानातून चकणा आणून दे, असे सांगितले. सोनालीने भावाला दुकानात जाऊ दिले नाही. याचा राग मनात ठेवून दारू पार्टी करणाऱ्या तरुणांनी रोहनला मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी मध्यस्थी करायला गेलेली सोनाली हिला देखील मारहाण करण्यात आली.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. घटनेची माहिती मिळताच खडकपाडा पोलिसांनी मारहाण करणाऱ्या सहा आरोपींना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली आहे. मात्र, या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे

Related Stories

No stories found.
logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com