Abhijeet Bichukle sitting in CM Chair
Abhijeet Bichukle sitting in CM ChairTeam Lokshahi

Abhijeet Bichukle sitting in CM Chair: बिचुकले सुद्धा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत! बिचुकले म्हणाले...

मागील दोन दिवस राज्यातील राजकारण हे मुख्यमंत्र्यांची खुर्ची व त्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीभोवती फिरताना दिसत आहे.
Published by :
Vikrant Shinde

अमोल धर्माधिकारी | पुणे : शुक्रवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र खासदार श्रीकांत शिंदे यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला व त्यानंतर श्रीकांत शिंदे यांच्यासह राज्य सरकारवर टीकेची झोड उठली. दरम्यान, शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे यांनी सुप्रिया सुळेंचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेला फोटो पोस्ट केला. मात्र, म्हात्रे यांनी पोस्ट केलेला फोटो हा मॉर्फ केलेला असल्याचं स्पष्ट झालं. त्यानंतर आता बिग बॉस फेम व राजकारणात रस असलेले अभिजीत बिचुकले यांचा त्याच मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत बसलेला फोटो व्हयरल होतो आहे. या फोटोसंदर्भात विचारलं असता बिचुकले यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे.

Abhijeet Bichukle sitting in CM Chair
मंत्री तानाजी सावंत हे आलेल्या रस्त्यावर शिवसैनिकांनी गौमुत्र शिंपडलं

काय म्हणाले बिचुकले?

  • फोटो कोणी मॉर्फ केला असेल त्यावर कारवाई करा.

  • हा चेष्टेचा, विषय नाही मुख्यमंत्री हे पद अस्मितेचं पद आहे.

  • मुख्यमंत्र्यांना संविधानिक पद असल्यानं असं करायला नको आहे.

  • सुप्रिया सुळेंचा फोटो मॉर्फ केला असेल तरी चुकीचं आहे.

शीतल म्हात्रे यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल झाली आहे. मात्र, आता अभिजीत बिचुकले यांचा फोटो मॉर्फ करणाऱ्या व्यक्तीचा पोलिस शोध घेतील का व कारवाई करतील का हे पाहणं गरजेचं आहे.

logo
Lokshahi Marathi
www.lokshahi.com